IND vs ENG 4th Test: जो रूटने जिंकला टॉस, भारताला पहिले बॅटिंगला बोलावले; टीम इंडियाने बर्थडे बॉयला वगळले
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने टॉस जिंकला आहे. भारत पहिले फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. ओव्हल मैदानात खेळल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण सामन्यासाठी दोन्ही संघात काही मोठे बदल झाले आहेत.
IND vs ENG 4th Test: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. अशा स्थितीत चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. ओव्हलच्या (The Oval) मैदानावर जो संघ सामना जिंकेल तो मालिकेत विजयी आघाडी घेईल. लंडनच्या ओव्हल मैदानावर आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकला आहे. भारत पहिले फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. ओव्हल मैदानात खेळल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण सामन्यासाठी दोन्ही संघात काही मोठे बदल झाले आहेत. इंग्लंडने जोस बटलर आणि सॅम कुरन (Sam Curran) यांच्या जागी क्रिस वोक्स आणि ओली पोपचा समावेश केला आहे. बटलरला दुसरे मूल होणार असल्यामुळे त्याने सामन्यातून माघार घेतली आहे तर कुरनला बाहेर बसवण्यात आले आहे. (IND vs ENG 4th Test Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six व DD Sports वर असे पाहा)
दुसरीकडे, भारतीय संघात देखील दोन बदल झाले आहेत. वेगवान गोलंदाज आणि बर्थडे बॉय इशांत शर्माला (Ishant Sharma) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इशांत चेंडूने अपेक्षित असे खास काम करू शकला नाही. ज्यामुळे त्याला चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. इशांतच्या जागी उमेश यादवचा समावेश झाला आहे. तसेच तिसऱ्या टेस्ट सामन्यात दुखापत झालेला रवींद्र जडेजा फिट होऊन प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. जडेजाचा संघात खेळणे म्हणजे टीम इंडियाने रविचंद्रन अश्विनला पुन्हा एकदा बेंचवर बसवले आहे. शिवाय, मोहम्मद शमीच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जो रूट (कॅप्टन), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), ओली पोप, मोईन अली, क्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)