IND vs ENG 3rd Test: लीड्स कसोटीपूर्वी जेम्स अँडरसनने Virat Kohli याला दाखवला आरसा, यंदाच्या मालिकेतील ‘या’ गोष्टीची करून दिली आठवण
तिसऱ्या कसोटीपूर्वी अँडरसनने विराटसोबत माईंड गेम खेळणे सुरु केले आहे. अँडरसनने विराटला चिथावणी दिली आणि आठवण करून दिली की या मालिकेत त्याची बॅटिंग सरासरी फक्त 20 आहे.
IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) मैदानावर खेळला जाणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि इंग्लिश संघाला पहिले गोलंदाजी करण्यास सांगितले. पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन (James Anderson) सामन्याकडे असेल. पहिल्या कसोटीत विराटला सुवर्ण शून्यावर बाद करणारा अँडरसन दुसऱ्या कसोटीत त्याला फारसा त्रास देऊ शकला नाही. अँडरसन आणि विराट यांच्यातील दुसऱ्या कसोटीदरम्यान मैदानात शाब्दिक चकमक रंगली. आणि आता तिसऱ्या कसोटीपूर्वी अँडरसनने विराटसोबत माईंड गेम खेळणे सुरु केले आहे. अँडरसनने विराटला चिथावणी दिली आणि आठवण करून दिली की या मालिकेत त्याची बॅटिंग सरासरी फक्त 20 आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर या मालिकेत विराटची सरासरी केवळ 20.66 आहे. (IND vs ENG 3rd Test: इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीने टॉस जिंकला, भारताची पहिले बॅटिंग; 'ही' आहे दोन्ही संघाची Playing XI)
विराटने आतापर्यंत तीन डावांमध्ये फलंदाजी केली आहे आणि त्याला अर्धशतकही करता आले नाही. पहिल्या कसोटीत सुवर्ण शून्यावर बाद झालेल्या विराटने दुसऱ्या कसोटीत अनुक्रमे 42 आणि 20 धावा केल्या. चांगली सुरुवात करूनही, विराट बाहेरील चेंडूवर आपली विकेट गमावत राहिला. यूके टेलिग्राफशी संभाषणादरम्यान अँडरसन म्हणाला, “क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येतात. मी त्याच्या (विराट) पेक्षा जास्त प्रतिस्पर्धी राहिलेल्या काही लोकांविरुद्ध गोलंदाजी केली आहे आणि मी त्यांच्याशीही सामना केला आहे. त्यामुळे माझे लक्ष क्रिकेटवर आहे, इकडे-तिकडे होणाऱ्या आवाजावर नाही.” अँडरसन पुढे म्हणाला, “आम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की विराटची सरासरी या मालिकेत 20 आहे, जे हे सिद्ध करते की आम्ही जागतिक दर्जाच्या फलंदाजाविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे. पण जर त्याने सरासरी 80 केले असते आणि आम्ही मालिकेत 1-0 वर असलो तर मला आनंद झाला असता.” भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंगहॅम कसोटी अनिर्णित राहिली, तर लॉर्ड्स कसोटी भारताने 151 धावांनी जबरदस्त विजय मिळवला आणि सध्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
दुसरीकडे, लीड्स कसोटीत टॉस जिंकून भारतीय संघ लॉर्ड्स कसोटी सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरला आहे. कॅप्टन कोहलीने हेडिंग्ले टेस्ट सामन्यासाठी पुन्हा एकदा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडे दुर्लक्ष केले आणि रवींद्र जडेजाला संघात कायम ठेवले आहे. तसेच दुखापतीतून सावरलेल्या शार्दूल ठाकूरला देखील संधी मिळाली नाही. दुसरीकडे, इंग्लिश संघाने डेविड मलान व क्रेग ओव्हरटन यांचा डोम सिब्ली आणि मार्क वूडकन्या जागी समावेश केला आहे.