IND vs ENG 3rd Test: लीड्स कसोटीत कशी असणार भारताची प्लेइंग इलेव्हन, रविचंद्रन अश्विनला मिळणार स्थान? पाहा काय म्हणाले माजी इंग्लिश कर्णधार
लीड्सच्या हेडिंग्ले येथे तिसरी कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंड माजी कर्णधार माइकल वॉनने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत मोठे विधान केले.
IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ (Indian Team) सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरी कसोटी बुधवारपासून लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले मैदानावर खेळली जाणार आहे. मालिकेच्या पहिल्या दोन कसोटींमध्ये भारताचा स्टार ऑफर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही आणि रवींद्र जडेजाला प्राधान्य देण्यात आले. लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) येथे तिसरी कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंड माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत मोठे विधान केले. वॉनला म्हणाले की अश्विन तिसऱ्या कसोटीत कमबॅक करू शकतो. वॉन पुढे म्हणाला की, वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या जागी अश्विनला संघात संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या जागी इशांतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत अश्विनला सलग तिसऱ्या कसोटीसाठी वगळण्यात आले तर त्याला आश्चर्य वाटेल असा दावा वॉनने केला आहे. (IND vs ENG 3rd Test 2021: कपिल देव यांच्या विक्रमामागे रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह! इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत मिळणार संधी)
हेडिंग्लेची खेळपट्टी थोडी कोरडी असेल आणि पावसाचा अडथळा कमी असेल किंवा नाहीच्या बरोबर असावा त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळेल असा अंदाज वॉनने व्यक्त केला. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने म्हटले की भारताने कसोटी सामन्यात दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह उतरावे. त्याने अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या जागी अश्विनला पाठिंबा दिला. वॉनने क्रिकबझशी झालेल्या संभाषणादरम्यान म्हणाले, “असे दिसते की हा एक चांगला आठवडा असेल. हे खूप कोरडे, छान आणि सनी असेल, म्हणून जर अश्विन या आठवड्यात खेळला नाही तर मला आश्चर्य वाटेल. मला वाटते की ते (भारत) तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह जातील, जे मला वाटते की हेडिंगले येथे योग्य निर्णय असेल. तसेच फलंदाजाची जागा भरते. तुम्ही तुमच्या तीन महान वेगवान गोलंदाजांसोबत खेळता. ईशांत शर्मा लार्ड्समध्ये शेवटच्या दिवशी चांगला खेळला असला तरीही प्लेइंग इलेव्हनमधील संधी गमावू शकतो.”
वॉनने दावा केला की हेडिंगले, लीड्स येथील खेळपट्टीवर फिरकीपटूंसाठी बरेच काही आहे. आणि खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे ते कोरडे होईल. तिसऱ्या कसोटीत दोन्ही संघांसाठी फिरकी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अश्विन सध्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. गेल्या काही काळापासून अश्विन फलंदाजी आणि चेंडूने चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत अश्विनने 32 विकेट घेतल्या आणि चेन्नईच्या कठीण विकेटवर शानदार शतक झळकावले.