IND vs ENG 3rd Test Day 1: जेम्स अँडरसनच्या जाळ्यात पुन्हा अडकले चेतेश्वर पुजारा, Virat Kohli; इंग्लिश गोलंदाजाची अनोख्या रेकॉर्ड-बुकमध्ये एंट्री

39 वर्षीय दिग्गज इंग्लिश गोलंदाजाने पुन्हा एकदा भारताच्या स्टार फलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्यांची शिकार केली आणि अनोख्या रेकॉर्ड-बुकमध्ये प्रवेश केला.

जेम्स अँडरसन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंड (England) संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) लीड्समध्ये (Leeds) खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी डावाच्या पाचव्या षटकात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि 11 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 39 वर्षीय दिग्गज इंग्लिश गोलंदाजाने पुन्हा एकदा भारताच्या स्टार फलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्यांची शिकार केली आणि अनोख्या रेकॉर्ड-बुकमध्ये प्रवेश केला. पुजाराने 9 चेंडूत फक्त 1 धाव केली आणि अँडरसनच्या उत्कृष्ट चेंडूवर विकेटकीपर जोस बटलरकडे कॅच आऊट झाला. अँडरसनने विराटला तशाच प्रकारे माघारी धाडले. अँडरसनने पुजारा आणि कोहलीला बाद करत स्टार ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनच्या (Nathan Lyon) विक्रमाची बरोबरी केली. लायन आणि अँडरसन आता कसोटी क्रिकेटमध्ये पुजारा व कोहलीची सर्वाधिक वेळा शिकार करणारे गोलंदाज बनले आहेत. (IND vs ENG 3rd Test: R Ashwin याच्या हाती पुन्हा निराशा, लीड्स कसोटीतही विराटने केले दुर्लक्ष; हेडिंगले प्लेइंग XI बाबत काय म्हणाला कॅप्टन कोहली जाणून घ्या)

लायन आणि अँडरसनने पुजारा-कोहलीला अनुक्रमे 10 आणि 7 वेळा पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशी अँडरसनने भारताच्या अव्वल फळीवर आपली जादू कायम ठेवली. 7 धावांवर फलंदाजी करणाऱ्या विराटच्या बॅटला लागून चेंडू थेट स्टंपच्या मागे जोस बटलरकडे गेला. दरम्यान लायन आणि अँडरसनला वगळता स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली, पॅट कमिन्स आणि बेन स्टोक्स यांनी कोहलीला प्रत्येकी पाच वेळा बाद करून या यादीत दुसरे तहान पटकावले आहेत. दुसरीकडे, अँडरसन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायननेही पुजाराला 10 वेळा बाद केले आहे. पॅट कमिन्सने पुजाराला सात वेळा, जोश हेजलवूडला सहा वेळा आणि ट्रेंट बोल्टने पाच वेळा कसोटीत पुजाराची शिकार केली आहे. इंग्लंडविरुद्ध या मालिकेत पुजाराचा खराब फॉर्म सुरूच आहे आणि त्याने आतापर्यंत पाच डावांमध्ये फक्त 71 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 45 धावा आहे.

लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून तिसऱ्या कसोटीत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत त्याने नाणेफेक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटीत, अँडरसनने पहिल्या षटकात फॉर्ममधील फलंदाज केएल राहुलला बाद करून भारतीय फलंदाजीला मोठे धक्का दिला. त्यानंतर त्याने पुजारा पाठोपाठ कोहलीची मोठी विकेट घेतली.