IND vs ENG 3rd Test 2021: मोटेरामध्ये टीम इंडियाचा मार्ग खडतर, सामन्यापूर्वी पहा James Anderson याची भेदक गोलंदाजी (Watch Video)

आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नव्याने तयार झालेल्या सरदार पटेल स्टेडियमवर गोलंदाजी करताना दिसत आहे.

जेम्स अँडरसन (Photo Credits: Twitter/ICC)

IND vs ENG 3rd Test 2021: अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात 24 फेब्रुवारीपासून तिसरा पिंक-बॉल टेस्ट (Pink-Ball Test) सामना सुरु होणार आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या चार सामन्यांच्या मालिकेचे अखेरचे दोन सामने अहमदाबाद येथील नव्याने बांधलेले मैदान सरदार पटेल स्टेडियमवर (Sardar Patel Stadium) खेळले जाणार आहेत. दोन्ही संघ पुढील दोन्ही सामन्यांसाठी अहमदाबादला पोहोचले असून तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा (James Anderson) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नव्याने तयार झालेल्या सरदार पटेल स्टेडियमवर गोलंदाजी करताना दिसत आहे. चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती मिळालेला अँडरसन मोटेरा स्टेडियमवर तिसऱ्या सामन्यातून इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करणे अपेक्षित असून संघात त्याच्या प्रवेशाने टीम इंडियाचा सामना जिंकण्याचा मार्ग नक्कीच खडतर होईल. (IND vs ENG 3rd Test 2021: Ishant Sharma पूर्ण करणार कसोटी सामन्यांचे शतक, Kapil Dev नंतर हा कीर्तिमान करणारा बनणार दुसरा वेगवान भारतीय गोलंदाज)

चार सामन्याच्या कसोटी मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारताला 227 धावांनी पराभूत केले, तर टीम इंडियाने दुसर्‍या कसोटी सामन्यात पराभवाची परतफेड करत 317 धावांनी विजय मिळवला. यजमान संघासाठी दुसर्‍या कसोटी सामन्यात अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विनने बॉल आणि फलंदाजीने आक्रमक कामगिरी केली होती. अँडरसनबद्दल बोलायचे तर इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या या वेगवान गोलंदाजाकडे भारताला पिंक-बॉल टेस्टमध्ये पूर्णतः आव्हान देण्याची क्षमता आहे.

अँडरसनने आतापर्यंत इंग्लंडकडून 158 कसोटी सामन्यात 26.5 च्या सरासरीने 611 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 30 वेळा एका डावात पाच आणि 27 वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये 600 किंवा अधिक विकेट घेणारा अँडरसन सध्याचा एकमेव गोलंदाज आहे. इतकंच नाही तर, भारताचा फिरकी दिग्गज अनिल कुंबळेच्या 619 विकेटच्या विश्वविक्रमाला मागे टाकण्यासाठी अँडरसन फक्त 8 विकेट दूर आहे आणि अहमदाबाद कसोटी सामन्यात हा टप्पा सर करण्यासाठी त्याच्याकडे सुवर्ण संधी आहे.



संबंधित बातम्या

WTC 2025 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया कुठे आहे, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवेश, पहा ताजे अपडेट

Australia vs India, 4th Test Day 5 Preview: पाचव्या दिवशी भारतीय फलंदाज इतिहास रचतील की ऑस्ट्रेलियन गोलंदाज कहर करतील, पाचव्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

New Zealand vs Sri Lanka, T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पहा दोन्ही संघांची महत्त्वाची आकडेवारी

ICC WTC 2025 Final: दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, टीम इंडिया अशी मिळवू शकते पात्रता