IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, असा आहे दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन
आजपासून सुरु झालेल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूटने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंड (England) आणि यजमान टीम इंडिया (Team India) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) तिसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे. जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियमवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. शिवाय, दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या निर्धारित असतील. सध्या दोन्ही संघातील चार सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. आजपासून सुरु झालेल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघाने (Indian Team) त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाजी क्रमात काही बदल केलेला नाही. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत तर दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्यात कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलचे स्थान कायम आहेत. (IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी विराट कोहलीची इंग्लंडला चेतावणी, म्हणाला- 'इंग्लंडमध्येही कमकुवतपणा, आमचे गोलंदाज भारी पडतील')
दुसरीकडे, पाहुण्या इंग्लंड संघाने देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनचा अंतिम-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात विश्रांती मिळालेल्या जॉनी बेअरस्टोला देखील संघात संधी मिळाली आहे. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि डोम सिब्लीची जोडी सलामीला येईल. वेगवान गोलंदाजी विभागात आर्चर आणि अँडरसनसह स्टुअर्ट ब्रॉडचा देखील समावेश आहे तर जॅक लीच आणि डोम बेस फिरकी विभाग सांभाळतील.
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), डोम सिब्ली, झॅक क्रॉली, जॉनी बेयरस्टो, ओली पोप, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.