IND vs ENG 3rd T20I 2021: बटलरच्या स्फोटक खेळीने विराटच्या खेळीवर फेरले पाणी, टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव, इंग्लंडची मालिकेत 2-1 ने सरशी

यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. फलंदाजीत सलामी जोस बटलरने सर्वाधिक नाबाद 83 धावा केल्या आणि संघाला विजयीरेष ओलांडून दिली. जॉनी बेअरस्टो नाबाद 40 धावांच्या खेळीसह बटलरला चांगली साथ दिली.

जोस बटलर (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 3rd T20I 2021: अहमदाबाद (Ahmedabad) येथे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंड (England) संघाने 8 विकेटने धमाकेदार विजय मिळवला. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताने (India) पहिले फलंदाजी करत दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश टीमने 18.2 ओव्हरमध्ये अवघ्या 2 विकेट गमावून लक्ष्य गाठले. फलंदाजीत सलामी जोस बटलरने (Jos Buttler) सर्वाधिक नाबाद 83 धावा केल्या आणि संघाला विजयीरेष ओलांडून दिली. डेविड मलानने 18 धावा केल्या. जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) नाबाद 40 धावांच्या खेळीसह बटलरला चांगली साथ दिली. भारताकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या. पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद 77 धावांची जबरदस्त खेळी केली. तसेच हार्दिक पांड्याने 17 धावा करत विराटला चांगली साथ दिली, तर रिषभ पंतने 25 धावा केल्या. इंग्लंडसाठी मार्क वुडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (IND vs ENG 3rd T20I 2021: Virat Kohli याचा ‘वन मॅन-शो’, KL Rahul लज्जास्पद विक्रमात अव्वल स्थानी; एका क्लिकवर पहा सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड)

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची खराब सुरुवात झाली. फिरकीपटू युजवेंद्र चहलने  जेसन रॉयला रोहित शर्माच्या हाती  कॅच आऊट केलं आहे. रॉयने 9 धावा केल्या. त्यानंतर बटलर आणि मलानच्या अर्धशतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. ओदनही फलंदाजाच्या दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी झाली आणि संघाने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 57 धावा केल्या. शिवाय, बटलरने देखील या पॉवर-प्लेचा पुरेपुर फायदा करून घेतला आणि 17 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 47 धावा केल्या. यानंतर बटलरने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि इंग्लिश संघाला सामन्यात मजबूत पकड मिळवून दिली. अखेर सुंदरला यजमान संघाला दुसरे यश मिळवून देत मलानला कीपर रिषभ पंतच्या हाती स्टपिंग केले. टॉस जिंकल्यापासून संपूर्ण सामन्यात पाहुण्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला.

यापूर्वी, तिसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर ओपनर रोहित शर्मा 15 धावा, ईशान किशन 4 धावा, केएल राहुल शून्यावर बाद झाले तर रिषभ पंतने 25 धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यरने संघाकडून 9 धावा केल्या तर हार्दिक पांड्याने 17 धावा केल्या. कोहली आणि हार्दिकने सहाव्या विकेटसाठी अवघ्या 25 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान विराटने जोरदार फटकेबाजी केली, तर हार्दिकनेही आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून मार्क वूडने 3 गडी बाद केले तर क्रिस जॉर्डनला 2 विकेट मिळाल्या.