IND vs ENG 3rd T20I 2021: Eoin Morgan याचा धडाकेबाज विक्रम, दिग्गजांच्या टी-20 रेकॉर्ड-बुकमध्ये एंट्री करणारा ठरला पहिला इंग्लिश क्रिकेटर
नाणेफेकीसाठी मॉर्गनने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाऊल ठेवले तेव्हा तो त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील 100वा सामना ठरला. इंग्लिश कर्णधाराने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Eoin Morgan 100th T20I Match: इंग्लंड संघाचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) भारताविरुद्ध (India) आजच्या टी-20 सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच एक खास कारनामा केला आहे. नाणेफेकीसाठी मॉर्गनने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाऊल ठेवले तेव्हा तो त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील 100वा सामना ठरला. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इंग्लंड कर्णधाराने 30.34च्या सरासरीने 2306 धावा केल्या असून देशाकडे टी-20 सामन्यांची शंभरी करणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे. मॉर्गन पाठोपाठ मर्यादित ओव्हरमधील सलामी फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) संघाकडून दुसऱ्या सर्वाधिक 76 टी-20 सामने खेळला आहे. भारतीय संघाविरुद्ध मॉर्गनने टॉस जिंकून यजमान संघाला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. इंग्लंडने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधून टॉम कुरनला बाहेर करत मार्क वूडचा समावेश केला आहे. (IND vs ENG 3rd T20I 2021: हिटमॅन Rohit Sharma तिसऱ्या टी-20 साठी मैदानात; इयन मॉर्गनने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग)
=
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानी दिग्गज शोएब मलिकच्या नावावर आहे. मलिकने आजवर सर्वाधिक 116 टी-20 सामने खेळले असून भारताचा रोहित शर्मा 108 आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर 103 टी-20 सामन्यांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, कसोटी, वनडे व टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी शंभर किंवा अधिक सामने खेळणारा टेलर आजवरचा एकमेव खेळाडू आहे. यांच्यानंतर, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी व मोहम्मद हफिझ, तसेच किवी फलंदाज मार्टिन गप्टिल यांनी प्रत्येकी 99 टी-20 सामने खेळले आहेत.
तिसर्या टी-20 सामन्यात इंग्लिश संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळवण्याच्या निर्धारित असेल. अहमदाबादच्या स्लो खेळपट्टीवर दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून पराभूत होण्यापूर्वी इंग्लंड संघाने यजमान संघाला मालिकेच्या सलामीच्या सामन्यात आठ विकेटने पराभूत करत विजयी सुरुवात केली होती.