IND vs ENG 3rd ODI 2021: शिखर धवन-रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक, इंग्लंडला विजयासाठी 330 धावांचे आव्हान
भारतासाठी शिखर धवन, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
IND vs ENG 3rd ODI 2021: पुणे (Pune) येथे सूर्य असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पहिले फलंदाजी करत 48.2 ओव्हरमध्ये 329 धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडला (England) विजयासाठी 330 धावांचे आव्हान ठेवले. भारतासाठी शिखर धवन (Shikhar Dhawan), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. रिषभ पंतने सर्वाधिक 78 धावा केल्या तर धवनने 67 आणि हार्दिकने 64 धावांचे योगदान दिले. शार्दूल ठाकूरने 30 धावा केल्या, कृणाल पांड्या 25 धावा शिवाय प्रसिद्ध कृष्णा धावा आणि भुवनेश्वर कुमार धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, इंग्लिश टीमकडून मार्क वूड यशस्वी गोलंदाज ठरला. वूडने 3 तर आदिल रशीदने 2 गडी बाद केले. शिवाय रिसी टोपली, सॅम कुरन, बेन स्टोक्स, मोईन अली, आणि लियाम लिविंगस्टोन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. (IND vs ENG 3rd ODI 2021: एक नंबर! Rishabh Pant ने एका हाताने खेचला षटकार, व्हिडिओ पाहून म्हणाल Wow!)
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मागच्या सामन्यातील फॉर्म कायम राखत टीम इंडियासाठी शतकी सलामी दिली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने बिनबाद 65 धावा केल्या. यानंतर धवनने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असताना रशीदने रोहितला बाद केले. रोहित 37 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. रोहितनंतर धवनही जास्त वेळ टिकला नाही आणि रशिदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. धवनने 10 चौकारांसह 67 धावा केल्या. मागील काही सामन्यांपासून उत्तम फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहलीला आज आपली जादू दाखवता आली नाही. मोईनच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 7 धावांवर बाद झाला. मागील सामन्यातील शतकवीर राहुललाही या सामन्यात चांगले प्रदर्शन करता आले नाही आणि वैयक्तिक 7 धावांवर माघारी परतला.
मधल्या फळीतील पडझडीनंतर पंत आणि हार्दिकने दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. यादरम्यान पंतने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. आक्रमक पंत डोकेदुखी ठरणार असताना सॅम कुरनने त्याचा काटा काढला. पंत आणि हार्दिकमध्ये 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हार्दिकनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर हार्दिकची बेन स्टोक्सने दांडी गुल केली.