IND vs ENG 3rd ODI 2021: शिखर धवनने अचूक पकडला Ben Stokes चा कॅच आणि Hardik Pandya याचा जीव भांड्यात पडला (Watch Video)
हार्दिक पांड्याने घातक इंग्लिश फलंदाज बेन स्टोक्सचा सोप्पा झेल ड्रॉप केला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हार्दिकच्या या चुकीमुळे स्टोक्सला 15 धावांवर खेळत असताना जीवनदान मिळाले. मात्र, नटराजनच्या चेंडूवर जेव्हा स्टोक्सने हवेत फटका खेळला तेव्हा शिखर धवनने चूक न करता कॅच झेलला आणि हार्दिकचा जीव देखील भांड्यात पडला.
IND vs ENG 3rd ODI 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील तिसर्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) घातक इंग्लिश फलंदाज बेन स्टोक्सचा (Ben Stokes) सोप्पा झेल ड्रॉप केला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हार्दिकच्या या चुकीमुळे स्टोक्सला 15 धावांवर खेळत असताना जीवनदान मिळाले. मात्र, यानंतर संघाचा टी-20 स्पेशलिस्ट गोलंदाज टी नटराजनच्या चेंडूवर स्टोक्सला स्वस्तात माघारी पाठवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. स्टोक्स आपल्या जबरा खेळीने संघासाठी कशी बाजी पलटवू शकतो हे आपण दुसऱ्या वनडे सामन्यात पहिलेच आहे. त्यामुळे नटराजनच्या चेंडूवर जेव्हा ऑफ साईडला स्टोक्सने हवेत फटका खेळला तेव्हा बाउंड्री लाईनवर असलेल्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) चूक न करता कॅच झेलला आणि यजमान संघाला मोठे यश मिळवून दिले. धवनला स्टोक्सचा अचूक कॅच पकडताना पाहून हार्दिकचा जीव देखील भांड्यात पडला आणि त्याने दंडवत नमस्कार केला. (IND vs ENG 3rd ODI: शार्दुल ठाकूरने ठोकला शानदार षटकार, पाहून थक्क झालेल्या Ben Stokes ने चेक केली बॅट, पहा मजेशीर Video)
टीम इंडियाने पहिले फलंदाजी करून इंग्लंडला दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याचा प्रत्युत्तरात 28 धावांवर दोन विकेट गमावल्या असताना स्टोक्सवर धावा करण्याची मोठी जबाबदारी होती. जेन रॉय 14 तर मागील सामन्यातील शतकवीर जॉनी बेअरस्टो एकच धाव करू शकला त्यामुळे स्टोक्ससह मधल्या फळीवर धावा करण्याची मोठा दबाव आला. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू स्टोक्स देखील दबावाला बळी पडला आणि चुकीचा शॉटमुळे माघारी परतला. स्टोक्सने 4 चौकार आणि 1 षटकांच्या मदतीने 39 चेंडूत 35 धावा केल्या. स्टोक्सच्या महत्वपूर्ण विकेटनंतर हार्दिकने मौल्यवान रिअक्शन दिली जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे तर टॉस गमावून पहिले फलंदाजी करणारा भारतीय संघ 48.2 ओव्हरमध्ये 329 धावांवर ऑलआऊट झाला. रिषभ पंतने संघासाठी सर्वाधिक 78 धावा केली तर हार्दिक पांड्यासह निर्णायक क्षणी 99 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पंत वगळता धवनने 67 आणि हार्दिकने 64 धावांचे योगदान दिले. शार्दूल ठाकूरने 30 तर कृणाल पांड्याने 25 धावा केल्या. इंग्लंडसाठी मार्क वूड यशस्वी गोलंदाज ठरला. वूडने 3 गडी बाद केले शिवाय आदिल रशीदला 2 विकेट मिळाल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)