IND vs ENG 3rd D/N Test: बेन स्टोक्सच्या कॅचवर झाला विवाद; अंपायरच्या निर्णयावर जो रुट, विराट कोहली यांच्या परस्पर विरोधी प्रतिक्रिया, पहा Video
गोलंदाजी करायला आलेल्या इंग्लिश टीमची निराशा स्पष्ट दिसून आले जेव्हा अंपायरने बेन स्टोक्सने स्लिपमध्ये पकडल्या कॅचवर भारतीय फलंदाजाला नॉटआऊट दिलं. यादरम्यान, इंग्लंड कर्णधार जो रूट मैदानावरील अंपायरवर संतापला.
IND vs ENG 3rd D/N Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्याचा पहिला दिवस चांगलाच मनोरंजक ठरला. दिवसाच्या पहिल्या सत्रापासून टीम इंडिया (Team India)फिरकीपटूंनी इंग्लंडवर हल्ला चढावला आणि दुसऱ्या सत्रापूर्वीच त्यांना स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. अशास्थितीत, गोलंदाजी करायला आलेल्या इंग्लिश टीमची निराशा स्पष्ट दिसून आले जेव्हा अंपायरने बेन स्टोक्सने (Ben Stokes) स्लिपमध्ये पकडल्या कॅचवर भारतीय फलंदाजाला नॉटआऊट दिलं. यादरम्यान, इंग्लंड कर्णधार जो रूट (Joe Root) मैदानावरील अंपायरवर संतापला. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर मैदानावरील अंपायरने शुभमन गिलला स्लिपमध्ये स्टोक्सच्या हाती कॅच आऊट दिले होते, मात्र थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यावर अंपायरचा निर्णय बदलला आणि त्याला नॉटआऊट दिलं. थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे रूट आणि इंग्लंड संघाला धक्का बसला. (Virat Kohli Imitates Steve Smith: विराट कोहलीने नेट्समध्ये स्टीव्ह स्मिथची बॅटिंग, जॅक कॅलिसच्या गोलंदाजीची केली नक्कल, पहा व्हिडिओ)
ही घटना भारतीय डावातील दुसर्या ओव्हरमधील आहे. ब्रॉडच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर गिलने बॅट हवेत फिरवली, पण चेंडूने त्याच्या बॅटच्या बाहेरील बाजूस लागून स्लिपमध्ये स्टोक्सच्या हाती गेला. स्टोक्सने बॉल पूर्णपणे पकडला होता की नाही याचीही खात्री नसल्याने अंपायरने थर्ड अंपायरवर निर्णय सोपवला. जेव्हा अंपायरने निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला तेव्हा त्यांना सॉफ्ट सिग्नलमध्ये गिलला आऊट दिले पण, स्टोक्सने पकडल्यानंतर बॉल जमिनीवर लागला होता हे रीप्लेमध्ये थर्ड अंपायरला आढळले आणि त्यांनीं गिलला नॉटआऊट दिले. यानंतर इंग्लिश कर्णधार रूट आणि भारत कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कॉन्ट्रास्ट प्रतिक्रिया दिल्या. रूट एकीकडे निराश दिसला तर इंग्लंडच्या अपीलवर विराट कोहली चकित झाला. रूटने ऑन फील्ड पंचांशी प्रदीर्घ चर्चा केल्यावर मान हलवत आपल्या फिल्डिंगच्या जागी परतला.
जो रूटने अंपायरशी केली चर्चा
‘स्टोक्स क्या बोल रहा है? ’
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. अक्षर पटेलने इंग्लंडला 112 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि 38 धावा देत एकूण 6 विकेट घेतल्या. सामन्याच्या पहिल्या डावात अक्षरने जॅक क्रोली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवले. अक्षरचा हा कसोटी क्रिकेटमधील दुसरा 5 विकेट हॉल होता. यापूर्वी त्याने दुसऱ्या चेन्नई सामन्यात इंग्लंडविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.