IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर ‘या’ कारणामुळे जसप्रीत बुमराह भारतीय चाहत्यांच्या नजरेत बनला खलनायक, असे काही केले की सर्वच झाले चकित
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणारा दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. ट्रेंट ब्रिजवर ब्रिटिशांच्या नाकीनऊ आणणारा जसप्रीत बुमराह लॉर्ड्सवर आपल्या लयीतून भटकलेला दिसला आणि त्याला पहिल्या डावात एकही विकेट मिळवता आली नाही. याचा दबाव त्याच्या गोलंदाजीतही दिसून आला आणि भारतीय वेगवान गोलंदाजाने एकापाठोपाठ एक एकूण 13 नो बॉल टाकले.
IND vs ENG 2nd Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या (Lords) ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लिश कर्णधार जो रूटच्या नावावर राहिला. रुटने शानदार फलंदाजी करत 180 धावांची नाबाद खेळी केली आणि इंग्लंडचा स्कोर 400 च्या जवळ पोहचवला. टीम इंडियाच्या 364 धावांच्या प्रत्युत्तरात ब्रिटिश संघाचा पहिला डाव 391 धावांवर आटोपला. ट्रेंट ब्रिजवर ब्रिटिशांच्या नाकीनऊ आणणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लॉर्ड्सवर आपल्या लयीतून भटकलेला दिसला आणि त्याला पहिल्या डावात एकही विकेट मिळवता आली नाही. याचा दबाव त्याच्या गोलंदाजीतही दिसून आला आणि भारतीय वेगवान गोलंदाजाने एकापाठोपाठ एक एकूण 13 नो बॉल टाकले. (IND vs ENG 2nd Test Day 3: जो रूटच्या शतकाने इंग्लंडची पहिल्या डावात 391 धावांवर मजल, दिवसाखेर टीम इंडियावर घेतली 27 धावांची नाममात्र आघाडी)
बुमराहने इतके नो बॉल टाकल्यावर चाहतेही आश्चर्यचकित झाले. भारताने पहिल्या डावात एकूण 17 नो बॉल टाकले, त्यापैकी 13 फक्त जसप्रीत बुमराहने टाकले. बुमराहने 26 ओव्हरच्या आपल्या गोलंदाजीत 79 धावा दिल्या, पण तो एकही विकेट काढू शकला नाही. बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात सलग दोन वेळा एका ओव्हरमध्ये तीन नो बॉल टाकले. यॉर्कर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा बुमराह लाईन लेंग्थपासून पूर्णपणे भरकटलेला दिसला. बुमराहने इंग्लंड डावाच्या 126 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनविरुद्ध 4 नो बॉल टाकले आणि एकूण 10 चेंडू टाकले. बुमराहची ही ओव्हर 15 मिनिटे टिकली. यावर चाहत्यांनी त्याला जबरदस्त ट्रोलही केले.
गोलंदाजी क्रीज लाइन:
नो-बॉल हे माझे नवीन सर्वोत्तम मित्र!
बुमराहचे नो-बॉल...
भारतासाठी ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात चांगली गोलंदाजी केली आणि टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. सिराजने 4 आणि इशांतने तीन इंग्लिश फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, तिसऱ्या दिवसाचा पहिले दोन सत्रे पूर्णपणे इंग्लंडच्या नावावर राहिले आणि भारतीय गोलंदाज विकेट्ससाठी संघर्ष करताना दिसले. परिस्थिती इतकी बिकट होती की लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाला विकेट मिळाली नाही. कर्णधार जो रूटने पहिले जॉनी बेअरस्टो (57) सोबत चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रूटने आपली शानदार फलंदाजी सुरु ठेवली आणि कसोटीतील 22 वे शतक झळकावले. रूटने नंतर जोस बटलर आणि मोईन अली यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघावर दबाव आणला. इशांतने पहिले बटलर व नंतर मोईन अली आणि सॅम कुरन यांना सलग चेंडूवर बाद करून सामन्यात टीम इंडियाला कमबॅक करून दिले. मोहम्मद शमीने खाते न उघडता जेम्स अँडरसनला क्लीन बॉलिंग करून इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)