IND vs ENG 2nd Test Day 4: आधी खाल्ला षटकार त्यानंतर इंग्लिश गोलंदाजाने रोहित शर्माशी ‘असा’ केला हिशोब चुकता! (Watch Video)
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्स येथे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून इंग्लिश गोलंदाज मार्क वूडने रोहित शर्मा व केएल राहुलना पॅव्हिलियनमध्ये धाडलं. वूडने रोहितला आपल्या शॉर्ट-बॉलच्या जाळ्यात अडकवले आणि 21 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IND vs ENG 2nd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात लॉर्ड्स (Lords) येथे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना यजमान इंग्लंडचा पहिला डाव देखील 391 धावांवर संपुष्टात आला. ब्रिटिश कर्णधार 180 धावा करून नाबाद राहिला. यासोबतच आता चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून रोहित शर्मा (Rohit Sharma) व केएल राहुलच्या सलामी जोडीने सुरुवात केली. गेल्या तीन डावात इंग्लंडला नाडणारी ही जोडी लॉर्ड्सच्या दुसऱ्या डावात मात्र फेल ठरली. इंग्लिश गोलंदाज मार्क वूडने (Mark Wood) दोन्ही सलामीवीरांना पॅव्हिलियनमध्ये धाडलं. वूडने 10व्या ओव्हरमध्ये पहिल्या डावातील शतकवीर राहुलला 5 धावांवर असताना यष्टीरक्षक जॉस बटलरच्या हाती झेलबाद करत भारताला पहिला झटका दिला. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर ‘या’ कारणामुळे जसप्रीत बुमराह भारतीय चाहत्यांच्या नजरेत बनला खलनायक, असे काही केले की सर्वच झाले चकित)
यानंतर वूड भारताच्या डावातील 12 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. वूडच्या या ओव्हरच्या एका शॉर्ट-बॉलवर रोहितने खणखणीत षटकार खेचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहितचा हा आवडता आणि प्रसिद्ध शॉट आहे. वूडच्या ओव्हरमधील एक चेंडू शॉर्ट-बॉल (Short Ball) टाकला याचा फायदा घेत रोहितने डावातील पहिला षटकार खेचत चेंडू स्टँडमध्ये पोहचवला. पण ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर वूडने हिशोब चुकता केला आणि रोहितला 21 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. वुड्सने उंच बाऊन्सर टाकला आणि या पुल शॉटवर रोहित नियंत्रण ठेवू शकला नाही. चेंडू बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या थेट मोईन अलीच्या हातात गेला. अशाप्रकारे वेगवान इंग्लिश गोलंदाजाने आपला बदल घेतला. लक्षात घेण्यासारखे म्हणजे रोहितला आज खेळाच्या पहिल्या तासात दुसरा धोकादायक शॉट खेळण्याची गरज नव्हती. रोहित शर्माच्या या निष्काळजी शॉटमुळे भारताने आपले दोन विकेट फक्त 27 धावांवर गमावले.
दुसरीकडे, लॉर्ड्सच्या पहिल्या डावात 157 चेंडूत 83 धावा करणारा रोहित नॉटिंगहमच्या पहिल्या कसोटीत ओली रॉबिन्सनविरुद्ध ही अशाच प्रकारे बाद झाला होता. दरम्यान, दुसऱ्या डावात 34 वर्षीय फलंदाजाने 36 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह 21 धावा काढल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)