IND vs ENG 2nd Test 2021: विराट कोहलीच्या अपीलवर 'Whistle Podu' ने गुंजले चेपॉक, Video पाहत म्हणाल- वाह कॅप्टन!

पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश टीमवर वर्चस्व गाजवलं आणि यादरम्यान, कर्णधार विराट कोहलीची दमदार कॅप्टन्सी पाहायला मिळाली. त्यादरम्यान कोहलीने भर मैदानात शिट्या मारताना दिसला. आणि यादरम्यान त्याने चाहत्यांनाही व्हिसल करण्याचे आवाहन केले.

विराट कोहलीचा Whistle Podu (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघ (Indian team) मजबूत स्थितीत दिसत आहे. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश टीमवर वर्चस्व गाजवलं आणि यादरम्यान, कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) दमदार कॅप्टन्सी पाहायला मिळाली. संपूर्ण सामन्यादरम्यान विराट नेहमीप्रमाणेच सक्रिय दिसत होता पण त्यादरम्यान त्याने काहीतरी केले ज्यानंतर चेपॉक स्टेडियममध्ये (Chepauk Stadium) उपस्थित चाहते त्वरित जागे झाले. इंग्लंडच्या डावातील 28वी ओव्हर संपल्यावर हा संपूर्ण प्रकारे घडला. इथे ओव्हर संपली आणि तिथे कॅप्टन कोहलीने भर मैदानात शिट्या मारताना दिसला. आणि यादरम्यान त्याने चाहत्यांनाही व्हिसल करण्याचे आवाहन केले. भारतीय प्रेक्षकांनी भारतीय कर्णधाराला नक्कीच मिस केले आणि सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात त्याला खूप प्रोत्साहन देण्यात आले आहे. एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, कोविड-19 महामारीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट अखेरीस इंग्लंडविरुद्ध 5 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यासह भारतात परतले. (IND vs ENG 2nd Test Day 2: Chepauk वर रविचंद्रन अश्विनचा सुपर शो, हरभजन सिंहला पछाडत भारतात सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा बनला दुसरा यशस्वी गोलंदाज)

दरम्यान, सामन्यादरम्यान विराटची अपील पाहून संपूर्ण चेपॉक स्टेडियम आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सच्या 'Whistle Podu' गाण्याने गुंजले. विराटच्या या कृत्याने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आणि काही मिनिटातच विराटचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. चाहते या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. बऱ्याच जणांना आयपीएलसुद्धा आठवले असेही यूजर्सने म्हटले. "चेन्नईमध्ये असताना, आपण #WhistlePodu! टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चेपॉकच्या प्रेक्षकांना जागं केलं आणि त्यांनीही निराश केलं नाही," असं कॅप्शन देत बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेपॉकवर भारताने 329 धावा केल्या, तर इंग्लंडचे फलंदाज पहिल्या डावात धावांसाठी संघर्ष करताना दिसले. इंग्लंडचा निम्मा संघ 52 धावसंख्येवर बाद झाला होता. कोरोना दरम्यान भारतात पहिल्यांदाच क्रिकेट मालिकेत आयोजन करण्यात आले आहेत. कोरोना काळात रिक्त स्टेडियममध्ये सामने खेळणारे खेळाडू देखील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा भरपूर आनंद घेत आहेत. चेपॉकवरील प्रेक्षक देखील भारतीय खेळाडूंना पाठिंबा देत आहे.