IND vs ENG 2nd Test 2021: रोहित शर्माचे दणदणीत शतक, अजिंक्य रहाणेने 'या' यादीत मिळवले मानाचे स्थान, Chepauk वर पहिल्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड

शंभरी धावसंख्येच्या आता 3 विकेट गमावणाऱ्या यजमान भारतीय संघाने दिवसाखेर 6 विकेट गमावून 300 धावांचा डोंगर उभारला आहे. यासह, चेपॉकच्या मैदानावर आजच्या सामन्यात अनेक रेकॉर्ड बनले जे खालीलप्रमाणे आहेत.

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. शंभरी धावसंख्येच्या आता 3 विकेट गमावणाऱ्या यजमान भारतीय संघाने (Indian Team) दिवसाखेर 6 विकेट गमावून 300 धावांचा डोंगर उभारला आहे. पहिल्या दिवसाखेर संघासाठी सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) जबरदस्त फलंदाजी करत दीडशतकी भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. रोहितने 231 चेंडूत 18 चौकार आणि 2 षटकारासह 161 धावा केल्या तर रहाणेने 149 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावा केल्या आणि संघाला दोनशे धावसंख्या पार करून दिली. कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली आणि मोईन अलीच्या (Moeen Ali) अप्रतिम फिरकी चेंडूवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला. यासह, चेपॉकच्या मैदानावर आजच्या सामन्यात अनेक रेकॉर्ड बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 2nd Test Day 1: चेपॉकवर पहिल्या दिवशी रोहित शर्मा-अजिंक्य रहाणेचा बोलबाला, दिवसाखेर टीम इंडियाचा स्कोर 300/6)

1. रोहित शर्माने आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान जॅक लीचच्या चेंडूवर षटकार खेचला. यासह, 'हिटमॅन' घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावर 200 टेस्ट षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला.

2. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध 130 चेंडूत शतकी धावसंख्या गाठली. रोहितचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील हे चौथे शतक असून भारताकडून WTC स्पर्धेत रोहित सर्वाधिक शतक करणारा भारतीय फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनने स्पर्धेत सर्वाधिक 5 शतके केली आहेत.

3. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड संघात झगडत असताना अजिंक्य रहाणे स्पर्धेत 1000 धावांचा टप्पा सर करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला. रहाणेच्या मागे मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माने 800 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

4. रोहित शर्माने 130 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकार मारत शंभरी गाठली आणि सर्व स्वरूपात चार देशांविरूद्ध शतके ठोकणारा रोहित इतिहासातील पहिला क्रिकेटर ठरला. रोहितने श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध (वनडे, टी-20 आणि टेस्ट) सामन्यात शतकी खेळी केली आहे.

5. रोहित शर्मा पहिले सात कसोटी शतक घरच्या मैदानावर करणारा पहिला भारतीय ठरला. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीनने भारतात पहिली सहा शतके झळकावत विक्रम नोंदवला होता.

6. भारतीय कर्णधार विराट कोहलीला मोईन अलीने शून्यावर माघारी धाडलं आणि असं करणारा पहिला फिरकीपटू ठरला. यापूर्वी, विराटला श्रीलंकेच्या सुरंगा लकमल, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि बांग्लादेशी वेगवान गोलंदाज अबू जायदने भारतात शून्यावर माघारी धाडलं आहे.

7. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा कसोटी शतक झळकावले आहे. इंग्लंडविरुद्ध टेस्ट, टी-20 आणि वनडे सामन्यात शतकी खेळी कारण रोहित वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिस गेलं याच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला.

8. कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शून्यावर बाद होण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. चेन्नई टेस्टच्या पहिल्या डावात मोईन अलीने विराटला भोपळा फोडू न देता माघारी धाडलं.

9. विराट शून्यावर बाद होण्याची ही 11वी वेळ होती. याबाबतीत त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ आणि विजय मांजरेकर यांची बरोबरी केली आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग सर्वाधिक 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

10. रोहित शर्माने चेन्नईत खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 150 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने कसोटी कारकीर्दीत चौथ्यांदा दीडशे धावा केल्या आहेत. रोहितने 207 चेंडूत आपले 150 धावा पूर्ण केल्या.

11. रोहित शर्माने 130 चेंडूत झुंजार शतक पूर्ण केलं जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 7वे  शतक ठरलं.

दुसरीकडे, दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडून रिषभ पंत नाबाद 33 आणि कसोटी पदार्पण करणारा अक्षर पटेल नाबाद 5 धावा करून खेळत होता. संघाकडून शुभमन गिल आणि कर्णधार कोहली पहिल्या डावात शून्यावर बाद झाले. रविचंद्रन अश्विन 19 चेंडूत 13 धावांवर बाद झाला.