IND vs ENG 2nd T20I 2025 Weather Report: दुसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस पडणार का? जाणून घ्या चेन्नईमधील हवामानची स्थिती

IND vs ENG: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) 25 जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जाणार आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025 Weather Report: दुसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस पडणार का? जाणून घ्या चेन्नईमधील हवामानची स्थिती
MA Chidambaram Stadium, Chennai (Photo Credit-X)

चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) 25 जानेवारी रोजी म्हणजे शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler)  खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  करत आहे. दरम्यान, 25 जानेवारी रोजी म्हणजे सामन्यादिवशी चेन्नईमध्ये हवामान कसे असेल याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

कसे असेल चेन्नईमध्ये हवामान?

अ‍ॅक्यूवेदरच्या अहवालानुसार, 25 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ असेल आणि पावसाची शक्यता नाही. 25 जानेवारी रोजी चेन्नईचे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना पावसाच्या व्यत्ययाशिवाय एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd T20I 2025: इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, BCCI ने व्हिडिओ केले शेअर)

चेपॉकमध्ये भारताचा कसा आहे रेकॉर्ड?

आतापर्यंत चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने एक जिंकला आणि एक गमावला. 2012 मध्ये टीम इंडियाला याच मैदानावर न्यूझीलंडकडून 1 धावेने पराभव पत्करावा लागला होता. या मैदानावर भारताचा शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होता. भारतीय संघाने हा सामना जिंकला होता.

(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2025 11:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).