IND vs ENG 2nd T20I 2021: खूप हुशार चाल! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन फलंदाजांच्या डेब्यूवर Michael Vaughan यांचे गमतीशीर ट्विट
“बीसीसीआयने सल्ला घेतला आहे आणि अधिक मुंबई इंडियन्स खेळाडूंचा सहभाग घेतल्याचे मला दिसून आले आहे ... खूप हुशार चाल आहे,” असे वॉन यांनी गमतीशीर ट्विट केले.
IND vs ENG 2nd T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनने (Indian XI) इंग्लंडचा (England) माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) याला चांगलेच प्रभावित केले. भारतीय व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) जोडी टी-20 डेब्यू कॅप दिली. सूर्यकुमारने अक्षर पटेलची जागा घेतली तर इशानला शिखर धवनच्या जागी सलामीला स्थान देण्यात आले. इयन मॉर्गनच्या इंग्लिश संघाविरुद्ध टीम इंडिया 5 गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. यावर आयपीएल चॅम्पियन संघाच्या आणखी काही खेळाडूंचा समावेश केला जो त्यांच्यानुसार चांगला आहे. “बीसीसीआयने सल्ला घेतला आहे आणि अधिक मुंबई इंडियन्स खेळाडूंचा सहभाग घेतल्याचे मला दिसून आले आहे ... खूप हुशार चाल आहे,” असे वॉन यांनी गमतीशीर ट्विट केले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर अवघ्या 2 दिवसांपूर्वी इंग्लंडने मालिकेच्या सलामीच्या सामन्यात यजमान संघाचा धुव्वा उडवला. (IND vs ENG 2nd T20I 2021: इशान किशन, सूर्यकुमार यादव यांच टी-20 डेब्यू; 100 IPL सामन्यानंतर डेब्यू करणारा SKY पहिला क्रिकेटर)
याआधी शुक्रवारी टी-20 च्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर वॉनने ट्विटरवर लिहिले होते की, “मुंबई इंडियन्स भारतीय टीमपेक्षा चांगला टी-20 संघ आहे!!!” यावर, भारताचे माजी फलंदाज वसीम जाफर यांनी उत्तर देत माजी इंग्लंड कर्णधाराची बोलतीच बंद केली. जाफर यांनी लिहिले की, “चार विदेशी खेळाडूंना खेळवण्याइतके सर्व संघ इतके भाग्यवान नसतात.” दरम्यान, रविवारी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या त्याच मैदानावर सलामीचा सामना आठ विकेटने गमावल्यानंतर भारता मालिकेत बरोबरी करण्यासाठी उत्सुक असेल. विशेष म्हणजे, कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला धावांचा पाठलाग करताना फक्त तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. टीमने अखेर 8 डिसेंबर 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे सामना गमावला होता.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी शिखर धवन आणि अक्षर पटेल यांना बाहेर बसवण्यात आलं आहे. शिवाय, रोहित शर्माला पहिल्या दोन टी-20 साठी विश्रांती देण्यात आल्याचं विराटने मागील सामन्यात स्पष्ट केलं असल्याने हिटमॅन आजच्या सामन्यात देखील खेळणार नाही. वर्ल्ड टी-20 कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची मालिका असेल, त्यामुळे टीमचं योग्य संतूलन साधण्याचा विराट आणि रवी शास्त्री यांचा प्रयत्न असेल. यंदा, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वर्ल्ड टी-20 कपचे आयोजन होणार आहे.