IND vs ENG 2nd T20I 2021: विराट कोहलीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ईशान किशन-सूर्यकुमार यादवचे टी-20 डेब्यू
आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करणायचा निर्णय घेतला आहे.
IND vs ENG 2nd T20I 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दुसरा रंजक सामना रविवारी म्हणजेच आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करणायचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात यजमान भारतीय संघाला (Indian Team) 8 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले ज्यामुळे आजच्या सामन्यातून ते पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. अशास्थितीत, टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना टी-20 पदार्पणाची संधी मिळाली असून शिखर धवन आणि अक्षर पटेल यांना वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, इंग्लंडने आपल्या विजयी संयोजनात काही बदल केले आहेत. (IND vs ENG 2nd T20I 2021 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील दुसरा टी-20 सामना लाईव्ह कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर)
भारताकडून ईशान किशन आणि केएल राहुलची जोडी सलामीला उतरेल तर सूर्यकुमार यादवला अक्षर पटेलच्या जागी संधी मिळाली आहे. सूर्यकुमारवर मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी असेल. धवन इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अवघ्या चार धावाच करू शकला होता शिवाय, रोहित शर्माला देखील फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे, आता भारतीय संघाने नवीन सलामी जोडीसह खेळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मागील सामन्यातील अन्य खेळाडूंचे स्थान कायम आहे. दुसरीकडे, इंग्लंडने सामन्यातील आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. मार्क वूडला बाहेर करत टॉम कुरनचा संघात समावेश केला आहे. इंग्लंडसाठी जोस बटलर आणि जेसन रॉयची जोडी पुन्हा एकदा सलामीला उतरेल.
पहा भारत इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत प्लेइंग XI: विराट कोहली (कॅप्टन), ईशान किशन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड प्लेइंग XI: इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन राय, जोस बटलर, जॉनी बेयरेस्टो, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, टॉम कुरन आणि आदिल रशीद.