IND vs ENG Test Series 2021: विराट कोहलीच्या रडारवर MS Dhoni याचे 3 मोठे रेकॉर्ड, इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये करावे लागणार 'हे' काम
कोहलीच्या नेतृत्वात जर टीम इंडियाने इंग्लिश संघाचा पराभव केल्यास विराट माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे 3 मोठे विक्रम मोडेल. धोनीने देशात 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि विराटनेही देशात 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
IND vs ENG Test 2021: भारतीय संघाचा (Indian Team) नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियामध्ये (Team India) परतला आहे. मुलाच्या जन्मा निमित्त कोहलीने डिसेंबरमध्ये क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता आणि आता पुन्हा संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेड (Adelaide) येथे खेळलेल्या अंतिम टेस्ट सामन्यात विराटने संघाचे नेतृत्व केले होते ज्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते अशास्थितीत कोहलीवर इंग्लंडविरुद्ध (England) मालिकेत सर्वांचे लक्ष लागून असेल. कोहली पुन्हा या जबाबदारीसाठी सज्ज झाला आहे आणि यंदा त्याची बॅट व नेतृत्वाची कसोटी लागणार आहे कारण इंग्लंड संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 क्लीन स्वीप करून भारत दौर्यावर आला आहे. कोहलीच्या नेतृत्वात जर टीम इंडियाने इंग्लिश संघाचा पराभव केल्यास विराट माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) 3 मोठे विक्रम मोडेल. (Virat Kohli Workout in Quarantine: विराट कोहली क्वारंटाइनमध्ये अशाप्रकारे राहतोय फिट, शेअर केला वर्कआऊट Video)
कसोटी कर्णधार म्हणून धोनीने देशात 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि विराटनेही देशात 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे, जर किंग कोहली इंग्लंडचा पराभव करण्यात यशस्वी झाल्यास तो 10वी मालिका जिंकत धोनीला मागे टाकेल. याशिवाय धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने मायदेशी एकूण 21 कसोटी सामने जिंकले आहेत तर विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत 20 कसोटी सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यास तो धोनीला पछाडत कसोटी कर्णधार म्हणून भारतीय भूमीवरील सर्वाधिक मॅच जिंकणारा कर्णधार ठरेल. इतकंच नाही तर धोनीने देशासाठी एकूण 90 कसोटी सामने खेळले आहेत, तर कोहली आतापर्यंत 87 सामने खेळला आहे. त्यामुळे, इंग्लंडविरूद्ध चार कसोटी सामने खेळल्यास विराट सर्वाधिक टेस्ट सामान्यांच्या बाबतीत धोनीच्या वरचढ होईल.
दरम्यान, 5 फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिले दोन सामने चेन्नई तर अंतिम दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील. विशेष म्हणजे तिसरी टेस्ट मॅच गुलाबी चेंडूने खेळली जाईल. चार कसोटी सामन्यानंतर पाच सामन्यांची टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल.