IND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की इंग्लंडमध्ये 10 दिवस क्वारंटाईन करण्याचे नियम निराश करणारे आहेत आणि लसीकरणावर अधिक विश्वास ठेवणे आवश्यक आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना कोरोना लसीकरण पूर्ण असूनहीकोरोना पॉझिटिव्ह थ्रोडाउन विशेषज्ञ दयानंद गाराणी यांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन राहावे लागले होते.

रवि शास्त्री (Photo Credits: Getty Images)

IND vs ENG 2021: भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की इंग्लंडमध्ये (England) 10 दिवस क्वारंटाईन करण्याचे नियम निराश करणारे आहेत आणि लसीकरणावर अधिक विश्वास ठेवणे आवश्यक आहे. इंग्लंड दौऱ्यावरील (England Tour) भारतीय संघाचे (Indian Team) गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) यांना कोरोना लसीकरण पूर्ण असूनही इंग्लंडच्या आरोग्य प्रोटोकॉलनुसार विकेटकीपर रिद्धिमान साहा व फलंदाज अभिमन्यु ईश्वरान सोबत कोरोना पॉझिटिव्ह थ्रोडाउन विशेषज्ञ दयानंद गाराणी यांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन राहावे लागले होते. या कालावधीत तिघांची आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आली होतु. यानंतर शनिवारी दोघे भारतारतीय दलात डरहम येथे सामील झाले. इतकंच नाही तर यामुळे साहा व ईश्वरान यांना काउंटी इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामन्याला देखील मुकावे लागले होते. (IND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश; COVID-19 नियमांमुळे होते क्वारंटाईन)

"माझा उजवा हात परतला आहे. सर्व मार्गाने नकारात्मक चाचणी करूनही 10 दिवस क्वारंटाईन राहून मी अधिक फिट आणि मजबूत दिसत आहे. निराशनजक आहेत हे आयसोलेशन नियम. लसीच्या 2 टीकांवर विश्वास ठेवायला हवा," शास्त्री यांनी ट्विट केले. भरत अरुण आणि शास्त्री यांच्यात अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहेत व या माजी क्रिकेटपटूंचा भारतीय संघाला खूप फायदा झाला आहे. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना कोविड-19 संसर्ग झाल्यावर साहा मे महिन्यात यापूर्वीच बरा झाला होता. बबलच्या आत अनेक प्रकरणांमुळे आयपीएलचा 14 वा हंगाम पुढे ढकलण्यात आला होता. 4 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. याशिवाय, इंग्लंड दौऱ्यावर युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत देखील कोविड-19 आढळला होता.

दुसरीकडे, सध्या ब्रिटन दौऱ्यावर टीम इंडिया खेळाडूंच्या दुखापतींशी झुंज देत आहे. इंग्लंड दौर्‍यावर आलेल्या 24 सदस्यीय संघातून तब्बल तीन खेळाडू आधीच जखमी झाले आहेत आणि त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये मोठी कोंडी निर्माण झाली आहे. शुबमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर या सर्वांना दुखापत झाली असून त्यांच्या बदली खेळाडूंची बीसीसीआयने अद्याप पुष्टी केलेली नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now