IND vs ENG Series 2021: टीम इंडियाला डबल दणका, आवेश खान पाठोपाठ ‘हा’ अष्टपैलू खेळाडूही इंग्लंड दौऱ्यातून आऊट
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला आणखी एक दुखापतीचा फटका बसला आहे. युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. वॉशिंग्टन सुंदर हा शुभमन गिल आणि अवेश खानच्या नंतर दौर्याबाहेर पडलेला तिसरा खेळाडू आहे. काउंटी इलेव्हन दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजचा चेंडू लागल्यानंतर सुंदरच्या बॉटल फ्रॅक्चर झाले.
IND vs ENG Series 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) असलेल्या भारतीय संघाला (Indian Team) आणखी एक दुखापतीचा फटका बसला आहे. युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आणि आवेश खानच्या (Avesh Khan) नंतर सुंदर दौर्याबाहेर पडलेला तिसरा खेळाडू आहे. भारत (India) आणि काउंटी इलेव्हन (County XI) दरम्यान प्रथम श्रेणी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजचा चेंडू लागल्यानंतर सुंदरच्या बॉटल फ्रॅक्चर झाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सुंदरच्या बोटाच्या दुखापतीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. आंतरराष्ट्रीय इंग्लंड दौर्यामधून सुंदर बाहेर पडल्याचीही दुसरी वेळ आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2018 मध्ये आयर्लंडमध्ये, जिथे भारत 2 टी-20 सामने खेळले होते, घोट्याच्या दुखापतीमुळे सुंदरला इंग्लंडमधून परत जावं लागलं होतं. (IND vs ENG Test 2021: इंग्लिश टेस्टसाठी Virat Kohli याचा नेट्समध्ये जोरदार सराव, BCCI ने शेअर केला व्हिडिओ)
दरम्यान, सुंदरच्या जागी भारतीय संघात अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल (Axar Patel) एक पर्याय आहे. मात्र, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या उपस्थितीत या युवा खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता कमी दिसत आहे. दरम्यान, भारताचा स्टँडबाय वेगवान गोलंदाज आवेश खानही दौर्याबाहेर पडल्याचे वृत्त समोर आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, आवेशच्या बोटाला दुखापत झाली आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज सध्या चालू असलेल्या सामन्यात काउंटी इलेव्हन संघाचा सदस्य होता. दुसरीकडे, भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या पाठीत कडकपणा जाणवल्यामुळे तो पहिला सराव सामना खेळला नाही पण त्याने पुन्हा नेट्समध्ये फलंदाजीला सुरुवात केली. शिवाय, उपकर्णधार अजिंक्य रहाणेला देखील हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला त्यामुळे तो देखील पहिल्या सराव सामन्याला मुकला. अशास्थितीत त्यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध भारताचे नेतृत्व करीत आहेत.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होईल. पाच कसोटी सामने अनुक्रमे 4, 12, 25, सप्टेंबर 2 आणि 10 मध्ये नॉटिंघॅम, लॉर्ड्स, लीड्स, लंडन आणि मँचेस्टर येथे खेळले जातील. सध्या सुरू असलेल्या प्रथम श्रेणी सामन्यानंतर भारतीय पथक इंट्रा-स्क्वाड सामना देखील खेळतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)