IND vs ENG 2021: अजिंक्य रहाणे, रिषभ पंत समवेत टीम इंडियाचा नेट्समध्ये कस्सून सराव, इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज (See Photos)
IND vs ENG 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या कसोटी सामन्याला आता मोजके दिवस शिल्लक आहेत. 4 ऑगस्टपासून टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) दोन्ही संघ आमनेसामने भिडण्यासाठी सज्ज आहेत. ब्रिटिश संघाला हलक्यात घेणे भारतीय संघाला (Indian Team) महागात पडू शकते त्यामुळे सध्या ते डरहम (Durham) येथे नेट्समध्ये कस्सून सराव करत आहेत. बीसीसीआयने (BCCI) सरावादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या सराव सामन्यातून भारतीय संघासाठी एक खुशखबर समोर आली आहे आणि ती म्हणजे काउंटी संघाविरुद्ध प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळू न शकलेले कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि युवा विकेटकीपर रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी देखील नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. (IND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर)
अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची दुखापत असूनही तो चांगल्या लयीत दिसत आहे. मंगळवारी तो उर्वरित पथकांसह सराव करताना दिसला. कोविड-19 मधून बरा झालेला रिषभ पंत देखील 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भाग घेण्यासाठी तयारीला लागला आहे. इंग्लंडविरुद्ध सलामीच्या सामन्यात भारताच्या सकारात्मक सुरुवातीला हे दोन्ही खेळाडू पूर्ण फिट होणे आवश्यक आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, आणि केएल राहुल देखील ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी डरहममध्ये सराव करताना दिसले. कोविड-19 प्रोटोकॉलमुळे रिषभ पंत व रिद्धिमान साहा अनुपस्थितीत असताना राहुलला विकेटकिपिंगची जबाबदारी देण्यात आली होती.
2019 मध्ये राहुलने वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. टीम इंडियाच्या 2018 इंग्लंड दौऱ्यात राहुलने ओव्हल येथे 149 धावांची खेळी खेळली होती. दरम्यान, आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात बदली खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव ब्रिटन संघावर रवाना होणार आहे. सराव सामन्यात आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली ज्यामुळे दोघे इंग्लंड दौऱ्यातुन बाहेर पडले आहेत. तसेच, क्रुणाल पांड्याची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सध्या दोन्ही संघ आयसोलेशनमध्ये आहेत आणि दुसरा टी-20 सामना बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.