IND vs ENG 1st Test Day 3, Nottingham Weather: भारत-इंग्लंड सामन्याच्या तिसऱ्या दिवसावर ओढावणार का ‘काळ्या ढगांचं संकट’? पाहा नॉटिंगहमच्या हवामानाचे अपडेट
पण पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. तसेच फक्त 33.4 ओव्हरचा खेळ होऊ शकला. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी नॉटिंगहम येथील हवामान कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Nottingham Weather Update: नॉटिंगहमच्या (Nottingham) ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) स्टेडियमवर भारत (India) आणि यजमान इंग्लंड (England) संघात आज पहिल्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. तसेच फक्त 33.4 ओव्हरचा खेळ होऊ शकला. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी नॉटिंगहम येथील हवामान (Nottingham Weather) कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. AccuWeather च्या हवामान अंदाजानुसार, बहुतांश ढगाळ आणि वारामय वातावरण राहील. म्हणजेच पाऊस पडू शकतो आणि सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील सलामीच्या सामन्यावर पावसाचे पाणी फेरू शकते. सकाळी पावसाच्या काही सरी अपेक्षित आहे आणि त्यानंतर दुपारी गडगडाटी वादळासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (IND vs ENG 1st Test Day 2: पावसामुळे बिघडला दिवसाचा खेळ; इंग्लंड गोलंदाजांसमोर भारताची घसरगुंडी, दुसऱ्या दिवसाखेर भारत 125/4)
दरम्यान, सामन्याचा पहिला दिवस भारतासाठी खूप चांगला ठरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लिश संघाचा पहिला डाव स्वस्तात आटोपलं. कर्णधार जो रूटने संघासाठी सर्वाधिक 64 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार विकेट घेतल्या तर मोहम्मद शमीने तीन, तर शार्दुल ठाकूरने दोन गाडी बाद केले. मोहम्मद सिराजच्या पदरी एक विकेट पडली. दुसऱ्या दिवसाशी भारताने पहिल्या डावातील बिनबाद 21 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचे वर्चस्व गाजवले होते पण दुसऱ्या सत्रात ब्रिटिश गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत भारतीय संघाला एका पाठोपाठ एक झटके दिले. दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहित शर्मा बाद झाला त्यानंतर टीम इंडिया फलंदाजीचे आधारस्तंभ- चेतेश्वर पुजारा, विराट कोहली व अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले.
भारतीय संघाची नौका डगमगत असताना केएल राहुल एक बाजू धरून खेळत होता. भारताकडून केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केले असून तो 57 धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच रिषभ पंत 7 धावांवर नाबाद असून आता या दोन युवा फलंदाजांवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आहे.