IND vs ENG 1st Test 2021: नाराज विराट कोहलीने अंपायर नितीन मेननकडे केली तक्रार, जाणून घ्या नक्की घडलं काय (Watch Video)

इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजी करताना खेळपट्टीच्या मधोमध धावताना दिसले, ज्यानंतर कोहलीने पंचांकडे तक्रार केली.

विराट कोहलीने अंपायर नितीन मेननकडे केली तक्रार (Photo Credits: Twitter)

IND vs ENG 1st Test 2021: पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मैदानावरील अंपायर नितीन मेननकडे (Nitin Menon) तक्रार करताना दिसत आहे. इंग्लंडचे (England) फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजी करताना खेळपट्टीच्या मधोमध धावताना दिसले, ज्यानंतर कोहलीने पंचांकडे तक्रार केली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये कोहली सामन्यादरम्यान पंच नितीन मेननकडे थेट इशारा करताना दिसत आहे. कोहलीचा हा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. यजमान भारतीय संघाला पहिल्या डावात 337 धावांवर गुंडाळल्यावर इंग्लंड संघाने 241 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव 178 धावांवर आटोपला. विशेष म्हणजे, इंग्लंडचे काही फलंदाज खेळीच्या दरम्यान खेळपट्टीवर धावताना दिसले. (IND vs ENG 1st Test Day 5: अँडरसनचा कहर; टीम इंडिया पराभवाच्या छायेत, लंचपर्यंत भारताच्या 6 बाद 144 धावा)

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने डीप बॅकपॉईड पॉईंटवर शॉट मारल्यावर इंग्लंड फलंदाज धाव घेण्यासारही धावले. लेग-स्लिपवर क्षेत्ररक्षण करणारा कोहलीच्या हे लक्षात येताच तो पंचांकडे आला आणि खेळाडू खेळपट्टीवर धावत असल्याची तक्रार केली. "ओय, मेनन (नितीन मेनन), सरळ धावही मधून धावत आहे," 32 वर्षीय विराटला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐकले जाऊ शकते. विराटचे हे शब्द ऐकून भाष्यकारांनी हसू अनावर होते. विराटच्या तक्रारीनंतर अंपायर इंग्लंड फलंदाजांना चेतावणी देताना दिसले.

दरम्यान, पाहुण्या इंग्लंड संघाने पहिला चेन्नई कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 420 धावांचे लक्ष्य दिले आहे. अशास्थितीत यजमान टीम इंडियाला विजयासाठी पाच्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर आणखी 276 धावांची गरज आहे. या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या टॉपच्या 6 फलंदाजांनी  शरणागती पत्कारली असून कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू आर अशीं मैदानात खेळत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, विराट कोहली आणि को फेब्रुवारी 2017 पासून घरच्या मैदानावर कसोटी सामना गमावला नाही आणि ते यंदा देखील त्यांची विजयी मालिका सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. दुसरीकडे, दुसर्‍या क्रमांकाच्या कसोटी संघाला त्यांच्या घरी चिथावणी देण्यासाठी पाहुणा संघ पूर्ण तयारीत आहे.