IND vs ENG 1st Test 2021: विराट कोहलीने पहिल्या दिवशी आपल्या या जेस्चरने जिंकली चाहत्यांची मनं, तुम्हीही कराल सलाम
भारत कर्णधार विराट कोहलीने लवकरच त्याच्या मदतीला धावला आणि पायाला स्ट्रेचिंग करून देण्यास मदत केली ज्यामुळे रूटला थोडा आराम मिळाला.
IND vs ENG 1st Test 2021: शुक्रवारी चेन्नई (Chennai) येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) दिवसभर बॅटिंग केली आणि परिणामी दिवसाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये त्याच्या पायात गोळे आले आणि तो खेळपट्टीवरच आडवा झाला. रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर षटकार मारल्यावर रूट वेदनाने मैदानावरच पडला. भारत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लवकरच त्याच्या मदतीला धावला आणि पायाला स्ट्रेचिंग करून देण्यास मदत केली ज्यामुळे रूटला थोडा आराम मिळाला. विरोधी संघाच्या खेळाडूबद्दल खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल नेटकाऱ्यानी किंग कोहलीचं कौतुक करण्यास सुरुवात केली. क्रिकेट हा जेंटलमन्स गेम खेळ आहे आणि त्यामध्ये खेळभावनेला सर्वात जास्त महत्व दिले जाते. आणि आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाली. (IND vs ENG 1st Test 2021: ‘मेरा नाम है वाशिंगटन, मुझे जाना है डीसी’! रिषभ पंतची मजेदार कमेंट स्टंप माइकमध्ये रैकॉर्ड, Video पाहून तुम्हालाही येईल हसू)
बीसीसीआयने विराटच्या या खेळभावनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे जो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. सामन्याच्या अखेरच्या काही ओव्हर दरम्यान रुटच्या पायात गोळे आले होते आणि रुट मैदानात पाठ टेकून खाली झोपला होता. यावेळी, इंग्लंडचे डॉक्टर मैदानात येण्यापूर्वीच कोहली त्याच्या मदतीला धावला. कोहलीने यावेळी रुटचा पाय उचलला आणि उपचार केले. पहा हा व्हिडिओ:
दुसरीकडे, दिवसाखेर रूटने भारतीय गोलंदाजांवर एक्तरगी वर्चस्व गाजवले. 100व्या कसोटी सामन्यात रुटने शतक झळकावण्याचा पराक्रम केला. भारत दौऱ्यापूर्वी इंग्लंड संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. जेथील दोन्ही सामन्यांत रुटने शतक झळकावलेले होते आणि आता भारताविरुद्ध सामन्यातही रुटने दमदार शतक झळकावत क्रिकेटमधील अनोखा विश्वविक्रम रचला आहे. त्याबरोबर रुटचे भारताबरोबर चांगले कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे. योगायोगाने, रुटने यापूर्वी भारतामध्ये पहिला, 50वा आणि शंभरावा कसोटी सामना खेळला आहे. 1968 मध्ये 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा इंग्लंडचे कॉलिन कौड्रे पहिले क्रिकेटपटू होते. त्यांच्यानंतर जावेद मियांदाद, इंझमाम-उल-हक, रिकी पॉन्टिंग, ग्रिम स्मिथ आणि हशिम अमला यांनाही या विक्रमला गवसणी घातली. कौड्रे आणि अॅलेक स्टीवर्ट नंतर हा पराक्रम गाठणारा रूट तिसरा इंग्रज आहे. विशेष म्हणजे पॉन्टिंग एक पाऊलदेखील पुढे गेला आणि त्याने 100व्या टेस्ट सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावले.