IND vs ENG 1st Test 2021: जो रूटने जिंकला टॉस, इंग्लंडचा पहिले फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
ए चिदंबरम स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूटने टॉस जिंकला आणि पहिल्या फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फिरकीप्रिय खेळपट्टीवर दोन्ही संघाने मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडला आहे.
IND vs ENG 1st Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेच्या पहिल्या सामन्याला चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकला आणि पहिल्या फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फिरकीप्रिय खेळपट्टीवर दोन्ही संघाने मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारताकडून पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला येईल, तर चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. विकेटकिपिंगची जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर असेल. आर अश्विन, शाहबाझ नदीम (Shahbaz Nadeem) आणि वॉशिंग्टन सुंदर संघात फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. नदीम कसोटी कारकिर्दीतील आपला दुसरा सामना खेळणार असेल. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा इलेव्हनमध्ये दोन वेगवान गोलंदाज आहेत. (IND vs ENG 1st Test: चेन्नई टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, Axar Patel याची दुखापतीमुळे एक्सिट; राहुल चाहर-शाहबाझ नदीम यांचा समावेश)
दुसरीकडे, टॉस जिंकून पहिले फलंदाजीला येणाऱ्या इंग्लंडसाठी रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ली सलामीला येतील. डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स आणि ओली पोप मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून जोस बटलरचे स्थान कायम आहे. डॉम बेस आणि जॅक लीच फिरकीने भारतीय फलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन वेगवान गोलंदाजी सांभाळतील.
असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ नदीम, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.
इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच.