IND vs ENG 1st Test 2021: Joe Root याने पूर्ण केले टेस्ट सामन्यांचे शतक, डेब्यू व 50व्या टेस्टनंतर इंग्लंड कर्णधारचा चेन्नई येथे कारनामा, वाचा सविस्तर
यासह पहिल्या कसोटीसाठी चेन्नईच्या मैदानावर पाऊल ठेवताच इंग्लंडचा कर्णधार जो रूटने इंग्लिश टीमसाठी 100वा टेस्ट सामना खेळण्याचा कीर्तिमान मिळवला आहे. योगायोगाने, रूटने 2012 मध्ये नागपुरामध्ये भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते आणि अवघ्या 4 वर्षांनंतर विझाग येथे आपला 50वा सामना खेळला होता.
Joe Root 100th Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चेन्नई येथे पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली आहे. यासह पहिल्या कसोटीसाठी चेन्नईच्या (Chennai) मैदानावर पाऊल ठेवताच इंग्लंडचा कर्णधार जो रूटला त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी भेट मिळाली आहे. टॉससाठी चेन्नईत उतरताच रूटने इंग्लिश टीमसाठी 100वा टेस्ट सामना खेळण्याचा कीर्तिमान मिळवला आहे. इंग्लंडसाठी क्रिकेटच्या या प्रतिष्ठित फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा रूट इंग्लंड संघाचा 15वा खेळाडू आहे. इंग्लंडसाठी 100 किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट सामने खेळण्याच्या यादीमध्ये माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने (Alastair Cook) मानाचे स्थान पटकावले आहे. कूकने इंग्लंडसाठी सर्वाधिक 161 सामने खेळले आहे. दरम्यान, रूटसाठी भारतात 100वा टेस्ट सामना खेळणे नक्कीच खास ठरेल आणि यामागील कारणही तसे खासच आहे. (IND vs ENG 1st Test 2021: जो रूटने जिंकला टॉस, इंग्लंडचा पहिले फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन)
योगायोगाने, रूटने 2012 मध्ये नागपुरामध्ये (Nagpur) भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते आणि Vizag येथे अवघ्या 4 वर्षांनंतर आपला 50वा सामना खेळला होता. शिवाय, सर्वात कमी वयात 100 टेस्ट सामना खेळणाऱ्यांच्या यादीत कूकचा तिसरा नंबर लागतो. माजी इंग्लंड कर्णधार कूकने 2013मध्ये 28 वर्ष आणि 353 दिवशी कसोटी सामन्यांची शंभरी गाठली होती. दुसर्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे ज्याने 2002 मध्ये 29 वर्ष व 134 दिवशी कारकिर्दीचा शंभरावा कसोटी सामना खेळला होता. आणि आता 30 वर्ष व 37 दिवसांत रूटने हा मैलाचा दगड गाठला आहे. रूटची कामगिरी नक्कीच खूप खास आहे कारण इंग्लंडचे बरेच खेळाडू या टप्प्यावर कधी पोहचु शकले नाही. नासीर हुसेन ते माइकल वॉन आणि वॅली हॅमंड ते डेरेक अंडरवूडपर्यंत कसोटी कारकीर्दीत हा पराक्रम कधीच साध्य करू शकले नाही. रूटने आता ग्रॅहम थॉर्पे आणि माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस यांची 100 टेस्ट सामना खेळण्याबाबत करोबरी केली आहे.
दरम्यान, रूटने आतापर्यंत भारताविरुद्ध 16 कसोटी सामने खेळले आहेत आणि 4 शतके व 9 अर्धशतकांसह 56.84 च्या सरासरीने 1421 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या फलंदाजांच्या यादीत भारताच्या विरुद्ध या शतकात कुक आणि केविन पीटरसन यांच्यानंतर भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारा तिसरा इंग्लिश खेळाडू आहे.