IND vs ENG 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यातून Rohit Sharma याला डच्चू, सोशल मीडियावर नेटकर्त्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया, पहा Tweets

या मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. सामन्यात टॉस जिंकून इंग्लंड संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर भारतीय संघाने सर्वांना चकित करत पहिल्या सामन्यासाठी सलामी फलंदाज रोहित शर्माला विश्रांती दिली आहे.

रोहित शर्मा (Photo Credits: Getty Images)

IND vs ENG 1st T20I: इंग्लंड (England) संघाविरुद्ध शुक्रवार, 12 मार्चपासून 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. सामन्यात टॉस जिंकून इंग्लंड संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर भारतीय संघाने (Indian Team) सर्वांना चकित करत पहिल्या सामन्यासाठी सलामी फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली आहे. त्यामुळे भारताकडून शिखर धवन आणि केएल राहुलची जोडी सलामीला उतरली आहे. तसेच तब्बल 15 महिन्यांनंतर भुवनेश्वर कुमारने भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले आहे. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 24 तासांपूर्वी केलेल्या वक्तव्यापेक्षा आताच निर्णय पूर्णतः वेगळा आहे. विशेष म्हणजे गुरुवारी विराटने रोहितसहा सलामीला कोण उतरणास असल्याच्या प्रश्नावर राहुलला पसंती दिली होती. मात्र, विराटने नाणेफेक दरम्यान दिलेल्या विधानाने सोशल मीडियावर यूजर्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. (IND vs ENG 1st T20I 2021: इंग्लंडचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; रोहित शर्माला विश्रांती तर भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूंचा समावेश)

तसेच, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आल्यामुळे सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले नाही. रोहितला वगळल्यामुळे भारतीय चाहते निराश झाले कारण 'हिटमॅन' तब्बल एक वर्षानंतर मर्यादित ओव्हर संघात परतला होता. ट्विटरवरील चाहते भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयावर खूष झाले आणि त्यांनी रोहितला डच्चू देण्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले. पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

जळतो माझ्यावर!

विराटची प्लेइंग इलेव्हन

कोहली आणि मॉर्गन!

विराट कोहली आणि प्रशिक्षक कोणत्या विचारात

मुंबई इंडियन्सचे चाहते

मुंबई इंडियन्स चाहते!

दुसरीकडे, अक्षर पटेलचा भारतानं प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. इंग्लंडविरुद्ध रोहितला पहिल्या दोन मॅचसाठी विश्रांती देण्यात आल्याचं विराटने टॉसवेळी सांगितलं. भारतीय टीममध्ये बऱ्याच कालावधीनंतर भुवनेश्वर कुमारचं आगमन झालं आहे. अहमदाबादच्या नावनिर्मित नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला जात आहे. दरम्यान, दोन्ही संघांतील ही मालिका टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून पहिली जात आहे. यंदा, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वर्ल्ड टी-20 कपचे आयोजन होणार आहे.