IND vs ENG 1st T20I: टी-20 मालिकेसाठी 'हिटमॅन' Rohit Sharma याने बदलला गियर, नेट्समध्ये लगावले जोरदार शॉट्स, पहा व्हिडिओ

भारतीय सलामी फलंदाज रोहित शर्माने देखील टी-20 फॉरमॅटसाठी आपला गियर बदलला आहे. सामन्याच्या काही तासांपूर्वी रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेट्समध्ये फलंदाजी करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यात भारतीय ओपनर जुन्या 'हिटमॅन'अवतारात दिसला.

रोहित शर्माचा हिटमॅन अवतार (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 1st T20I: इंग्लंड (England) संघाच्या भारत दौऱ्यावरील कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया (Team India) आता 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी सज्ज आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेचे पाचही सामने खेळले जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाचे (Indian Team) लक्ष्य टी-20 मालिका जिंकण्याकडे असेल. अशास्थितीत भारतीय सलामी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील टी-20 फॉरमॅटसाठी आपला गियर बदलला आहे. सामन्याच्या काही तासांपूर्वी रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेट्समध्ये फलंदाजी करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यात भारतीय ओपनर जुन्या 'हिटमॅन'अवतारात दिसला. आजपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव करून कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा इंग्लंड संघाचा निर्धार असेल. वर्षाखेरीस भारतात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे त्यामुळे ही दोन्ही संघांसाठीही ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. (IND vs ENG T20 Series 2021: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात टी-20 क्रिकेटमध्ये ‘या’ खास रेकॉर्डसाठी रंगणार चढाओढ)

दरम्यान, रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेट प्रॅक्टिसमध्ये तो लांबच लांब शॉट्स खेळताना दिसत आहे. सामन्यापूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले की आगामी मालिकेसाठी रोहितसह केएल राहुल सलामीला उतरेल आणि शिखर धवन संघाचा तिसरा सलामी फलंदाज असेल. इंग्लंडविरुद्ध या मालिकेत रोहित आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मार्टिन गप्टिलला सर्वाधिक षटकारांच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावू शकतो. रोहितने 108 सामन्यांत 127 षटकार ठोकले आहेत तर किवी सलामी फलंदाज सर्वाधिक षटकारांच्या पहिल्या क्रमांकावर आहे. गुप्टिलने 99 सामन्यात 139 षटकार ठोकले आहेत. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन 97 सामन्यात 113 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

दुसरीकडे, भारत-इंग्लंड संघातील टी-20 मालिकेबद्दल बोलायचे तर दोन्ही संघात आतापर्यंत 14 टी-20 झाले असून त्यापैकी 7 सामन्यात टीम इंडियाने, तर तितक्याच सामन्यांमध्ये इंग्लिश संघाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने भारतात इंग्लंडविरुद्ध 6 टी-20 सामने खेळले आहेत, यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येक तीन सामने जिंकले आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना