IPL Auction 2025 Live

IND vs ENG 1st ODI 2021: Virat Kohli याचा विक्रमांचा वर्षाव, सचिन तेंडूलकर याच्यानंतर सर्वाधिक वेगाने ठोकल्या 10 हजार धावा

घरच्या मैदानावर सचिनने 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत, तर कोहली या एलिट यादीत सामील होणार दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st ODI 2021: पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) संघादरम्यान खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार फलंदाजी केली आणि वनडे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 61वे अर्धशतक ठोकले. इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात कोहली 56 धावांवर बाद झाला. मार्क वूडने कोहलीला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. दरम्यान, आपल्या शानदार अर्धशतकी खेळीसह कोहलीचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) एका खास क्लबमध्ये समावेश झाला आहे. घरच्या मैदानावर सचिनने 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत, तर कोहली या एलिट यादीत सामील होणार फक्त दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर आता होम ग्राऊंडवर 10002 धावांची नोंद झाली आहे. (IND vs ENG 1st ODI 2021: शिखर धवन नर्व्हस नाईंटीचा शिकार, विराट-कृणाल-राहुलचा अर्धशतकी तडाखा; इंग्लंडला विजयासाठी 318 धावांचे लक्ष्य)

विशेष म्हणजे, कोहलीने 176व्या सामन्यात ही विशेष कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या होम ग्राउंडवर दहा-हजार धावांचा डोंगर सर करणारा विराट सहावा फलंदाज आहे. कोहलीपूर्वी सचिन, रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. शिवाय, विराट या प्रकारात सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. आपल्या घरच्या मैदानावर सचिनने सर्वाधिक 14192 धावा केल्या आहेत. सचिननंतर पॉन्टिंग 13117 धावा, कॅलिस 12305 धावा, संगकारा 12043 धावा, आणि जयवर्धने 11679 धावांसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने 432 सामन्यात 55 च्या सरासरीने 22689 आंतरराष्ट्रीय धावा केल्या असून सचिन तेंडुलकर अद्यापही या प्रकरणात आघाडीवर आहे. सचिनने कारकीर्दीत 48 च्या सरासरीने 664 सामन्यांत 34357 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, कोहलीने आपल्या 61वे वनडे आणि 104व्या आंतरराष्ट्रीय अर्धशतकासह दक्षिण आफ्रिकेचे महान फलंदाज कॅलिस यांना पछाडले. कॅलिसने 328 सामन्यात 103 अर्धशतकांची नोंद केली. सचिन तेंडुलकरच्या 145, कुमार संगकारा च्या 118 आणि रिकी पॉंटिंगच्या 112 पन्नास पेक्षा अधिक धावानंतर विराट या यादीत चौथा फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्ध विराटचे सर्व फॉरमॅटमधील 27वे अर्धशतक होते ज्याने त्याला राहुल द्रविडच्या बरोबरीला आणले. इंग्लिश संघाविरुद्ध द्रविड विराटने एकूण 19 अर्धशतक केले आहेत.