IND vs ENG 1st ODI 2021 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिला वनडे सामना लाईव्ह कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर मालिकेचे सर्व तीन सामने खेळले जाणार आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी सामना टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, चाहते Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकतात.
IND vs ENG 1st ODI 2021 Live Streaming: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात द्विपक्षीय मालिकेच्या तिसऱ्या राउंडला (वनडे मालिका) आजपासून सुरु होणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Mahatrashtra Cricket Association) गहुंजे स्टेडियमवर मालिकेचे सर्व तीन सामने खेळले जाणार आहे. मालिकेचा पहिला सामना असल्याने सामना नक्कीच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे, कारण एकीकडे भारतीय संघ (Indian Team) इंग्लंडविरुद्ध आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर इंग्लिश संघ विजय पथावर परतण्याच्या निर्धारित असेल. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांसाठी सामना टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, चाहते Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइट व Jio TV वर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकतात. (IND Vs ENG ODI Series: इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात Virat Kohli मोडू शकतो 'हे' 5 मोठे रेकॉर्ड)
यापूर्वी विराट कोहलीच्या संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका 3-1 आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 असा विजय मिळवला होता. ‘विराटसेना’ सध्या वनडे संघाच्या रँकिंगमध्ये दुसर्या स्थानावर आहेत तर इंग्लिश संघ क्रमवारीत आघाडीवर आहेत. अशास्थितीत, 23 मार्चपासून पुण्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत जगातील दोन अव्वल संघातील ही लढत पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, 2017 नंतर इंग्लंड संघाने भारतात वनडे मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताची ती पहिली मालिका होती ज्यात संघाने अटीतटीच्या सामन्यात 2-1 असा विजय मिळवला होता.
पहा भारत-इंग्लंड वनडे संघ
भारताचा एकदिवसीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
इंग्लंडचा एकदिवसीय संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, मार्क वूड.