IND vs BAN 1st Test Day 1: टॉस जिंकून बांग्लादेशचा पहिले बॅटिंगचा निर्णय, पहा भारत-बांग्लादेशचा Playing XI

आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार मोमीनुल हक याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत-बांग्लादेश (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) मधील 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेला आज इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरुवात होत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार मोमीनुल हक (Mominul Haq) याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मागील टेस्ट मॅचमधून टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. शाहबाझ नदीम (Shahbaz Nadeem) याच्या जागी इशांत शर्मा (Ishant Sharma) याला संघात स्थान मिळाले आहेत.  ही मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. टी-20 मालिका गमावल्यानंतर बांग्लादेशचे संपूर्ण लक्ष टेस्ट मालिका जिंकण्याकडे असेल, तर टीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. भारताने या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. कर्णधार विराट कोहली या मालिकेसह पुन्हा मैदानात उतरणार आहे. त्याच्या वर्कलोड लक्षात घेत, निवड समितीने त्यालाटी-20 मालिकेसाठी विश्रांती दिली होती. टीम इंडियासाठी पुन्हा एकदा मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील, तर मधल्या फळीची जबाबदारी विराट, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा यांच्यावर असेल. (IND vs BAN Test 2019: विराट कोहली याच्याकडे बांग्लादेशविरुद्ध टेस्ट मालिकेदरम्यान 'हे' रेकॉर्ड मोडत इतिहास घडविण्याची तयारीत, वाचा सविस्तर)

आजवर टीम इंडियाने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाच सामने खेळले असून सर्व सामने जिंकल्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, बांग्लादेशी संघ या मालिकेसह टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात करेल.

असा आहे टीम इंडिया आणि बांग्लादेशचा प्लेयिंग इलेव्हन:

भारतः रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव.

बांगलादेशः शादमन इस्लाम, इम्रुल कायस, मोहम्मद मिथुन, मोमीनुल हक (कॅप्टन), मुश्फिकुर रहीम, महमूदुल्ला, लिटन दास, मेहेदी हसन, तैजुल इस्लाम, अबू जायद आणि इबादत हुसेन