IND vs BAN 3rd T20I: युजवेंद्र चहल याने घेतल्या सर्वात जलद 50 टी-20 विकेट; आर अश्विन, जसप्रीत बुमराह यांना टाकले मागे
बांग्लादेशविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 50 विकेट पूर्ण केले. टीम इंडिया आणि बांग्लादेशविरुद्ध अखेरच्या सामन्यात चहलने एक विकेट घेताच आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 50 विकेट घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला.
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ने रविवारी इतिहास रचला. बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 50 विकेट पूर्ण केले. टीम इंडिया आणि बांग्लादेशविरुद्ध अखेरच्या सामन्यात चहलने एक विकेट घेताच आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 50 विकेट घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. इतकेच नाही, तर चहलने भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वात जलद 50 विकेट घेतल्या आहेत. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये चहलने बांगलादेशी कर्णधार महमूदुल्लाची शिकार केली तेव्हा हे विशेष कामगिरी केली. चहल टी-20 मध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे. चहलने आपल्या 34 व्या सामन्यात ही कामगिरी केली होती, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Burmah) ने भारताकडून 41 सामन्यांत आणि आर अश्विन (R Ashwin) ने 42 सामन्यात हा पराक्रम केला होता. मात्र, श्रीलंकेचा माजी गोलंदाज अजंथा मेंडिस याच्या नावावर सर्वात वेगवान 50 विकेट घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे. मेंडिसने 26 सामन्यात हा विक्रम केला होता. (IND vs BAN 3rd T20I: दीपक चाहर याने बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियासाठी पहिली हॅटट्रिक घेत टी-20 मध्ये केली सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद)
भारताकडून सर्वाधिक टी-20 विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने आतापर्यंत 46 सामन्यांत 52 बळी घेतले आहेत. अश्विनशिवाय बुमराहने 42 सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत. चहलपूर्वी भारताचा हा विक्रम वेगवान गोलंदाज बुमराहच्या नावावर होता, त्याने 41 सामन्यांत 50 गडी बाद केले होते. टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा (Lasith Malinga) ने केला आहे. मलिंगाने 79 सामन्यात एकूण 106 गडी बाद केले आहेत.
दरम्यान, दीपक चहर (Deepak Chahar) याने हॅटट्रिकसह सहा गडी बाद केले. यासह टीम इंडियाने फलंदाजीनंतर गोलंदाजीत चमकदार पुनरागमन करत रविवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात बांग्लादेशला 30 धावांनी पराभूत करुन तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. दिल्लीतील पहिला सामना हरल्यानंतर राजकोटमधील दुसरा सामना जिंकून भारत परतला. आता या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जातील.