IND vs BAN 2nd T20I: 100 व्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा याची विक्रमी कामगिरी, नोंदवले हे' रेकॉर्ड, वाचा सविस्तर
आजच्या सामन्यात रोहितने टी-20 क्रिकेटमधील त्याचे 18 वे अर्धशतक केले आणि अनेक रेकॉर्डस् ची नोंद केली. 48 धावा करत टी-20 मध्ये 2500 धावा करणारा रोहित पहिला फलंदाज बनला आहे. शिवाय, रोहितने राजकोटमध्ये रोहितने पाच चौकार मारत यावर्षी 200 चौकार पूर्ण केल्या.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) साठी राजकोट (Rajkot) टी -20 खूप खास आहे. बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध राजकोटमधील दुसराटी-20 सामना त्याच्या कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. 100आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा रोहित पहिला भारतीय, जगातील दुसरा क्रिकेटपटू बनला आहे. यापूर्वी, माजी पाकिस्तानी अष्टपैलू शोएब मलिक (Shoaib Malik) याने 100 टी-20 सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. मलिकने 111 टी-20 सामने खेळत निवृत्ती जाहीर केली. या सामन्यात रोहितने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टी -20 सामन्यात 2452 धावा करणारा रोहित सर्वाधिक धावा करणारा आहे. या काळात रोहितचा स्ट्राइक रेट 136.67 आहे, ज्यात चार शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. पण, आजच्या सामन्यात रोहितने टी-20 क्रिकेटमधील त्याचे 18 वे अर्धशतक केले आणि अनेक रेकॉर्डस् ची नोंद केली. (IND vs BAN 2nd T20I: रिषभ पंत याच्या चुकीच्या Stumping वर भडकले Netizens, झाली एम एस धोनी याची आठवण, पाहा Tweets)
बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात 24 धावा करत रोहितने 2019 मध्ये त्याचे 2000 धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी रोहितने यावर्षी क्रिकेटच्या वनडे, टेस्ट आणि टी-20 मध्ये 54.88 च्या सरासरीने 1976 धावा केल्या आहेत. रोहितने आजवर यावर्षी 9 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. 48 धावा करत टी-20 मध्ये 2500 धावा करणारा रोहित पहिला फलंदाज बनला आहे. शिवाय, रोहितने राजकोटमध्ये रोहितने पाच चौकार मारत यावर्षी 200 चौकार पूर्ण केल्या.
टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या यादीत दुसर्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत टी-20 सामन्यात 2450 धावा केल्या आहेत.