IND vs BAN 1st Test Day 1: मोहम्मद शमी याने घेतल्या 3 विकेट, बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात

यानंतर बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला. बांग्लादेशने पहिल्या डावात 58.3 ओव्हरचा सामना केला.

मोहम्मद शमी (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात इंदोरमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतिल पहिला सामना खेळला जात आहे. बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुल हक (Mominul Haq) याने इंदौर टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला. बांग्लादेशने पहिल्या डावात 58.3 ओव्हरचा सामना केला. प्रथम फलंदाजी करताना इम्रुल कयास आणि शादमान इस्लाम यांनी बांग्लादेशसाठी डावाची सुरुवात केली. मात्र सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 6 धावांवर इम्रुल कायस अजिंक्य रहाणे याच्याहाती उमेश यादव (Umesh Yadav) याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पुढच्या षटकातील शेवटच्या बॉलवर इशांत शर्मा (Ishant Sharma) याने दुसरा सलामी फलंदाज शादमान इस्लाम याला 6 धावांवर रिद्धिमान साहा याच्या हाती झेलबाद करीत होता. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याने सर्वाधिक 43 धावा केल्या. टीम इंडियासाठी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. इशांत, उमेश आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (IND vs BAN 1st Test Day 1: इंदोर टेस्टमध्ये आर अश्विन याची विक्रमी कामगिरी; अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्यासह 'या' खास क्लबमध्ये झाला समावेश)

बांग्लादेशला तिसरा धक्का मोहम्मद मिथुन याच्या रूपात लागला. मिथुनने 13 धावा केल्या आणि मोहम्मद शमी याच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. पहिल्या दिवशी लंचआधी भारताने एकूण तीन गडी बाद केले. जेवणानंतर आर अश्विन याने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पहिला विकेट घेतली. अश्विनने विरोधी संघाचा कर्णधार मोमिनुल हक याला क्लीन बोल्ड केले आणि त्याच्या कारकीर्दीतिल घरच्या मैदानावर 250 वी टेस्ट विकेट होती. यानंतर अश्विनने भारताला पाचवे यश मिळवून देत 10 धावांच्या वैयक्तिक धावावर महमूदुल्ला याला क्लीन बोल्ड केले. दरम्यान, चहाच्या अगदी आधी शमीने दोन चेंडूंत दोन गडी बाद केले. शमीने पहिले 43 धावांवर मुशफिकुर रहीमला क्लीन बोल्ड केले, आणि पुढच्याच चेंडूवर मेहदी हसन एलबीडब्ल्यू झाला. चहापानानंतर पहिल्याच चेंडूवर इशांतने लिटन दास याला 21 धावांवर कर्णधार विराट च्या हाती झेलबाद केले. बांग्लादेशला 9 वा धक्का देत रवींद्र जडेजा याने तैजुल इस्लाम याला 1 धाववर धावबाद केले. उमेशने बांग्लादेशची दहावी विकेट काढली. इबादत हुसेन 2 धाव करत बोल्ड झाला.

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बांग्लादेशचा हा पहिला सामना आहे. यजमान भारतीय संघाने कसोटी स्पर्धेमधील शेवटचे पाच सामने जिंकले आहेत. आणि बांग्लादेशविरुद्ध भारतीय संघ कसोटीत विजयी ताल कायम ठेवण्याच्या निर्धारित असेल.