IPL Auction 2025 Live

IND vs BAN 1st T20I: शिवम दुबे याला बाद करण्यासाठी आफिफ हुसैन याने पकडला अप्रतिम कॅच, आपल्याच गोलंदाजीवर केली ही कमाल, पाहा Video

पण, पदार्पणाच्या सामन्यात शिवम खास खेळी करू शकला नाही आणि 1 धावावर हुसैनने त्याचा झेल पकडला आणि त्याला माघारी धाडले. अफीफच्या गोलंदाजीवर शिवमने ऑन-साईडवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू टर्न झाला आणि त्याच्या बॅटच्या कोपऱ्याला लागून अफीफकडे हवेत उडाला.

(Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात सुरु असलेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये अफिफ हुसैन (Afif Hossain) याने आपल्याच गोलंदाजीवर एक कमालीचा कॅच पकडला आणि शिवम दुबे (Shivam Dube) याला माघारी धाडले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने 6 बाद 148 करत टी-20 भारतविरुद्ध विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यासह शिवमने भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण, पदार्पणाच्या सामन्यात शिवम खास खेळी करू शकला नाही आणि 1 धावावर हुसैनने त्याचा झेल पकडला आणि त्याला माघारी धाडले. अफीफ भारताविरुद्ध 16 वी ओव्हर टाकत होता. (IND vs BAN 1st T20I: शिखर धवन याला Run-Out करण्यावरून रिषभ पंत याला Netizens ने केले ट्रॉल, पाहा Tweets)

15 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर शिवम 1 धावावर खेळत होता. अफीफच्या गोलंदाजीवर शिवमने ऑन-साईडवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू टर्न झाला आणि त्याच्या बॅटच्या कोपऱ्याला लागून अफीफकडे हवेत उडाला. चेंडू अफीफच्या डोक्यावरून जात असताना, त्याने मोठी उडी मारली आणिहवेत शानदार झेल पकडला. यासह शिवमचा डेब्यू डाव संपुष्टात आला. पाहा अफीफच्या या झेलचा अप्रतिम व्हिडिओ:

भारताच्या अनुभवी संघाला 148 धावांवर रोखण्यासाठी अफीफने महत्वाची भूमिका बजावली. अफीफने 3 ओव्हरमध्ये 11 धावा देत 1 विकेट मिळवली. बांग्लादेशकडून शफीउल इस्लाम आणि अमिनुल इस्लाम यांनी प्रयेकी 2 गडी बाद केले. भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन याने सर्वाधिक 44 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज रिषभ पंत याने 27, श्रेयस अय्यरन याने 22 धावा केल्या. बांग्लादेशने टॉस जिंकून पहिलेगोलंदाजांनी करत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व कायम ठेवले. कर्णधार रोहित शर्मा २ चौकार मारत पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले.