IND vs AUS Test 2020: चेंडू हेल्मेटवर आदळल्याने Will Pucovski जायबंदी; पहिल्या टेस्ट सामन्यात सलामीला उतरण्याबाबत अनिश्चितता
संरक्षणात्मक फलंदाजी हेल्मेटच्या पुढच्या भागावर त्याचा जोरदार फटका बसला तो त्याच्या गुडघ्यावर पडला आणि काही मिनिटं खेळपट्टीवरच बसून राहिला.
IND vs AUS Test 2020: भारताविरुद्ध (India) कसोटी मालिका सुरु होण्यापुर्वी ऑस्ट्रेलियन (Australia) फलंदाज Will Pocovski याच्या पासून यजमान संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार माइकल क्लार्क आणि इयान चॅपल यांनी 22 वर्षीय फलंदाजाचे कौतुक केले कारण आणि म्हणाले की तो देशाचे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे. पण ऑस्ट्रेलिया अ संघाच्या भारत अ संघाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान Pucovskiच्या हेल्मेटवर कार्तिक त्यागीचा (Kartik Tyagi) चेंडू आदळला आणि त्याला मैदानातून बाहेर नेण्यात आले. युवा भारतीय वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीच्या चेंडूवर हेल्मेटवर जोरदार झटका बसला तेव्हा पुकोवस्की 23 धावांवर फलंदाजी करीत होता. त्याच्या संरक्षणात्मक फलंदाजी हेल्मेटच्या पुढच्या भागावर त्याचा जोरदार फटका बसला तो त्याच्या गुडघ्यावर पडला आणि काही मिनिटं खेळपट्टीवरच बसून राहिला. त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, पण टीम डॉक्टर जॉन ऑर्चर्ड हजेरीनंतर तो चालू शकला अशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली. (IND-A vs AUS-A Tour Match: भारत-ऑस्ट्रेलिया पहिला सराव सामना ड्रॉ, पहिल्या सराव सामन्यात रिद्धिमान साहाची अर्धशतकी खेळी)
सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारत-अ संघाला 9 बाद 189 धावांवर रोखल्यावर ऑस्ट्रेलिया अ संघापुढे 15 ओव्हरमध्ये 131 धावांचे लक्ष्य होते, पण त्यांना 1 बाद 52 धावांचं करता आल्या ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला. दरम्यान, कांगारू संघाचा नियमित सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला यापूर्वीच दुखापत झाली आणि त्याचे पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याने Will Pucovski याला त्याचा उत्तम पर्याय मानले जात होते. पण भारत-अ संघाविरुद्ध सराव सामन्यात दुखापत झाल्याने Pucovski याच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्यावर अनिश्चिततेचे ढग दिसत आहे. त्याची दुखापत गंभीर असल्याने ऑस्ट्रेलियाला त्याच्या ऐवजी मैदानावर उतरावे लागेल जे त्यांच्यासाठी एक मोठी डोकेदुखी असेल. पाहा Will Pucovski याचा हा व्हिडिओ:
टीम इंडिया आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघात 17 डिसेंबरपासून बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना दिवस/रात्र सामना तो अॅडिलेडच्या मैदानावर खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात पहिल्या गुलाबी चेंडूने कसोटी मालिका खेळली जाणार आहे.