IND vs AUS 2020: डेविड वॉर्नर याने शेअर केलेल्या वानखेडे सामन्या दरम्यानच्या खास क्षणाच्या फोटोवर Netizens ने दिल्या गमतीशीर प्रतिक्रिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामना काही काळ थांबावा लागला, जेव्हा एक पंतंग कापून मैदानात आला. वॉर्नरने या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि यूजर्सना याला कॅप्शन देण्यास सांगितले. यानंतर सोशल मीडियावरील चाहत्यांनी पतंगबरोबर वॉर्नरने शेअर केलेल्या फोटोवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या.

डेविड वॉर्नर (Photo Credit: Instagram)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामना काही काळ थांबावा लागला, जेव्हा एक पंतंग कापून मैदानात आला. पंतग जमिनीजवळ असलेल्या स्पायडर कॅमच्या जाळ्यात अडकला होता. यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. मकर संक्रांती सप्ताह (15 जानेवारी म्हणजेच आज) चालू आहे आणि पतंग आजकाल भारतात खूप सहज उडताना दिसतात. या सामन्यादरम्यान मुंबईच्या आकाशात मोठ्या संख्येने पतंग उडत होते. भारतीय डावाची 49 वी ओव्हर सुरू होण्या आगोदर एक पतंग मैदानावर पडली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने त्याला उचलून अंपायरला दिली. वॉर्नरने या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि यूजर्सना याला कॅप्शन देण्यास सांगितले. यानंतर सोशल मीडियावरील चाहत्यांनी पतंगबरोबर वॉर्नरने शेअर केलेल्या फोटोवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या. (Video: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात विकेट न मिळाल्याने हताश विराट कोहली याने अंपायरसह घातला वाद)

सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज वॉर्नरच्या लक्षात आले की पतंग स्पायडर कॅमच्या वायरमध्ये अडकलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमी याच्या पहिल्यांदा नजरेत ही गोष्ट पहिल्यांदा आली, आणि नंतर  वॉर्नरने ती पतंग उचलून अंपायरला दिली. वॉर्नरचा पतंगसोबतच फोरो व्हायरल होताच सोशल मीडियावर यूजर्सने मिम्सने धुमाकूळ घातला.

वॉर्नरने शेअर केलेला फोटो

 

View this post on Instagram

 

Caption this? 😂😂

A post shared by David Warner (@davidwarner31) on

पाहा वॉर्नरच्या फोटोवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

यानंतर वॉर्नरचे नाबाद 128 आणि कर्णधार आरोन फिंच याच्या नाबाद 100 धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाने दिलेले 256 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावत भारताने दिलेले लक्ष्य पूर्ण करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. यापूर्वी, सुरुवातीच्या संघर्षानंतर शिखर धवन याने चांगला खेळ केला. त्याने आणि केएल राहुलने 121 धावांची भागीदारी केली. राहुल 47 तर धवनने 74 धावा फटकावल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन केले. त्याच्या गोलंदाजांनी नंतरच्या सहा ओव्हरमध्ये पाच गडी बाद केले. भारतीय कर्णधार विराट कोहली याला 16 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर अ‍ॅडम झांपाने बाद केले. रिषभ त आणि रवींद्र जडेजा यांनी थोडा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण भारताचा संपूर्ण संघ 49.1 षटकांत 255 धावांवर ऑलआऊट झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now