IPL Auction 2025 Live

IND vs AUS Boxing Day Test 2020: टीम इंडियाच्या DRS अपीलवर दोनदा बचावला मिचेल स्टार्क, पहा व्हिडिओ

पण या दरम्यान DRS मध्ये चेंडू त्याच्या बॅटला लागल्याचे दिसून आले, एलबीडब्ल्यूची शक्यता नसल्याचेही तपासले गेले, परंतु तो या प्रकरणातही तो बचावला गेला.

मिचेल स्टार्क आऊट होण्यापासून वाचला (Photo Credits: YouTube)

IND vs AUS 2nd Test Match 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) कांगारू संघाला आठ गडी राखून पराभूत केले आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यादरम्यान भारतीय संघाकडून 96व्या षटकात फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्क (Mitchell Starc) गोलंदाजीसाठी आलेल्या फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) चेंडू समजू शकला नाही आणि चेंडू त्याच्या पॅडवर लागला व कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) स्लिपमध्ये त्याचा झेल पकडला. यावर भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि मैदानावरील अंपायरांनी देखील त्याला बाद म्हणून निर्णय दिला. अंपायरने बाद केल्यानंतर स्टार्कनेही पॅव्हिलियनच्या दिशेने वाटचाल सुरू केली, पण या दरम्यान DRS मध्ये दिसून आले की चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही तर तो खेळाडूच्या पॅडला लागून रहाणेच्या हातात गेला. (IND vs AUS 2nd Test 2020: टीम इंडिया अशाप्रकारे करतेय ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा, पहा Photos)

दरम्यान, एलबीडब्ल्यूची शक्यता नसल्याचेही तपासले गेले, परंतु तो या प्रकरणातही तो बचावला गेला. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसला. सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टार्कचे नशीब त्याच्यावर जास्तच मेहरबान असल्याचे दिसले आणि हे गोलंदाजालाही कळून चुकले होते म्हणूनच एकाच चेंडूवर दोनदा बाद होताना वाचल्याबद्दलचा आनंद स्टार्कच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 89 मिनिटे फलंदाजी केली आणि 56 चेंडूंचा सामना करून नाबाद 14 धावा केल्या. शिवाय, पहिल्या डावात त्याने 8 चेंडूंचा सामना करताना 1 चौकारांच्या मदतीने आपल्या संघासाठी सात धावा केल्या होत्या. पहा व्हिडिओ:

दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या गचाळ फिल्डिंगचा मोठा फटका बसला. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेसह अन्य भारतीय फलंदाजांचे सोप्पे कॅच कांगारू खेळाडूंनी सोडले प्रत्युत्तरात भारताने मोठी आघाडी घेतली. शिवाय, संघातील अनुभवी खेळाडूंचे अपयश देखील यजमान संघावर भारी पडले. यजमान संघाचा एकही फलंदाज या सामन्यात अर्धशतकी धावसंख्या पार करू शकला नाही. दुसऱ्या डावात कॅमरुन ग्रीनने 45 तर मथ्यु वेडने 40 धावा केल्या. तसेच पहिल्या डावात मार्नस लाबूशेनने 48 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघात 7 जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाईल. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आयोजित केला जाणार आहे.