IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेन टेस्टमध्ये विकेटच्या मागे ‘स्पायडरमॅन स्पायडरमॅन’ गाणं गाताना रिषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हालाही फुटेल हसू

चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होता तेव्हा पंतचा विकेटच्या मागे ‘स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तुने चुराया मेरा दिल का चैन’ हे भोजपुरी गाणं गात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिषभ पंत (Photo by Robert Cianflone/Getty Images)

IND vs AUS 4th Test 2021: टीम इंडियाचा (Team India) यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आपल्या फलंदाजीशिवाय मैदानावरच्या त्याच्या अ‍ॅंटिकमुळे बर्‍याचदा चर्चेत राहतो. त्याला स्टम्प माइकवर विकेटच्या मागून बऱ्याचदा त्याला बोलताना ऐकले गेले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मालिकेतही तो बर्‍याच वेळा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्लेज करताना दिसला आहे. यासाठी त्याच्यावरही टीकाही करण्यात आहे, पण यावेळी त्याचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जे पाहून सोशल मीडियावर यूजर्सना हसू अनावर होत आहे. ब्रिस्बेन (Brisbane) येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होता तेव्हा पंत आपला प्रतिस्पर्धी आणि ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine) फलंदाजी करत असताना वेगळ्याच मूडमध्ये दिसला. वॉशिंग्टन सुंदरच्या 56व्या ओव्हरमध्ये पेन आणि ग्रीन क्रीजवर फलंदाजी करीत असताना पंतला स्पायडरमॅन चित्रपटाचे थीम गाणं विकेटच्या मागे गाताना ऐकले गेले. (Rishabh Pant Will Break MS Dhoni's Record: लवकरच ऋषभ पंत मोडणार महेंद्र सिंह धोनीचा 'हा' विक्रम; केवळ एक धावाची गरज)

23 वर्षीय पंतचा विकेटच्या मागे ‘स्पायडरमॅन स्पायडरमॅन, तुने चुराया मेरा दिल का चैन’ हे भोजपुरी गाणं गात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर त्याला त्यानंतर 'असे वेब फेक वेब (कोळ्याचे जाळे)' असे बोलतानाही ऐकले गेले. प्रतिस्पर्धी फलंदाजाला विचलित करण्यासाठी पंत अनोखी शक्कल लढवतो. तथापि, पंतच्या या गाण्यामुळे पेन आणि ग्रीनला फारसा फरक पडला नाही आणि त्यांनी एकत्रितपणे संघाची धावसंख्या 200 पार पर्यंत नेली. पेनने बाद होण्यापूर्वी 27 धावा केल्या आणि ग्रीनने 37 धावांचे योगदान दिले. दरम्यान, गब्बाच्या मैदानावर सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या दुसऱ्या डावात कांगारू संघाचा दुसरा डाव 294 धावांवर आटोपला आणि टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले. आता शेवटच्या दिवशी भारतीय संघाला 324 धावांची गरज असून त्याचे 10 विकेट्स बाकी आहेत. पहा पंतचा हा मजेदार व्हिडिओ:

दोन्ही संघातील कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून आज सामन्याच्या अंतिम दिवशी विजय संघ निर्धारित होईल. सामना अनिर्णित राहिल्यास टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कायम ठेवेल. मात्र, यजमान संघ पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करेल.