IND vs AUS 4th Test 2021: रिषभ पंतची बडबड थांबेना, ब्रिस्बेन टेस्ट सामन्यात मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या भारतीय विकेटकीपरवर भडकले ऑस्ट्रेलियन दिग्गज
ऑस्ट्रेलियाचे दोन माजी दिग्गज खेळाडू मार्क वॉ आणि शेन वॉर्न यांनी पंतवर विकेटच्या मागे सतत बोलत असल्याचा आरोप केला असून त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना एकाग्रता राखणे कठीण झाले आहे. वॉ म्हणाले की पंतने कमीतकमी गोलंदाजी करताना आपली बडबड बंद ठेवावी.
IND vs AUS 4th Test 2021: टीम इंडियाचा (Team India) यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची (Rishabh Pant) विकेटकीपिंग नेहमीच चर्चेत असते. पंत अनेकदा यष्टीचीत किंवा विकेटच्या मागे झेल घेताना चुका करतो. पण, यंदा तो विकेटच्या मागे सतत बोलण्यासाठी रडारवर आला आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन माजी दिग्गज खेळाडू मार्क वॉ (Mark Waugh) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांनी पंतवर विकेटच्या मागे सतत बोलत असल्याचा आरोप केला असून त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना एकाग्रता राखणे कठीण झाले आहे. वॉ म्हणाले की पंतने कमीतकमी गोलंदाजी करताना आपली बडबड बंद ठेवावी. ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) सुरु असलेल्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशीही असेच काहीसे पाहायला मिळाले जेव्हा पंत ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडला (Matthew Wade) स्लेज करताना दिसला आणि वॉर्न व मार्क वॉने पंतच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (AUS Vs IND 4th Test: रिषभ पंत याच्या अपीलवर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासह 'हे' खेळाडू मैदानातच लागले हसू; पाहा व्हिडिओ)
पंत वेडशी संभाषण करत असताना मार्क वॉ म्हणाले, “मला किपरच्या बोलण्याबद्दल काहीही आक्षेप नाही. पण, जेव्हा गोलंदाज चेंडू टाकतो तेव्हा शांत बसणे योग्य आहे. माझ्यामते अंपयरांनी याबद्दल दखल घेणे गरजेचे आहे. खेळाडू यात काहीही करू शकत नाही.” वॉ यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत वॉर्न म्हणाला,” पंतला विपक्षी खेळाडूंशी संभाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, गोलंदाज जेव्हा चेंडू टाकण्यासाठी तयार असताना असे करणे चुकीचे आहे. गोलंदाज रनअप घेण्यास सुरुवात करतो, तेव्हा किपरने शांत असणे गरजेचे आहे, असे नसेल तर फलंदाजाच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.” चहाच्या काही मिनिटांपूर्वी वॉशिंग्टन सुंदर आपल्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी करत होता. यावेळी पंत सुंदरच उत्साह वाढवण्यासाठी सतत बोलत होता ज्यामुळे, फलंदाजीसाठी तयार असलेला वेडला एकाग्रता राहता आले नाही. अशा स्थितीत त्याने एका प्रसंगी बॅटिंग करण्यास नकार दिला आणि म्हटले की पंत जोवर बोलणे थांबवणार नाही तोपर्यंत तो बॅटिंग गार्ड घेणार नाही.
ऑस्ट्रेलिया दौर्यावर असणारे भारतीय खेळाडू आणि यजमान यांच्यात स्लेजिंग सामान्य झाली आहे. सिडनी टेस्टमधेही रविचंद्रन अश्विन फलंदाजी करीत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन सतत त्याला त्रास देत होता.या घटनेबद्दल सामना संपल्यानंतर पेनने अश्विनचीही दिलगिरी व्यक्त केली होती.