Rishabh Pant Drops Will Pucovski Twice: अरेरे! रिषभ पंत याच्याकडून कॅच सुटला, विल पुकोव्हस्कीला दुसऱ्यांदा मिळाले जीवनदान, पहा Video

पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेनच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात डेविड वॉर्नरला स्वस्तात माघारी धाडलं, पण दुसऱ्या सत्रात पंतच्या दोन चुकांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली.

रिषभ पंत, भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी टेस्ट (Photo Credit: Twitter/cricketcomau)

IND vs AUS 3rd Test Day 1: टीम इंडियाचा युवा विकेटकीपर रिषभ पंतची (Rishabh Pant) गचाळ फिल्डिंग पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहे. भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियासाठी (Australia) आजच्या सामन्यात विल पुकोव्हस्कीने (Will Pucovski) पदार्पण केले आहे आणि पदार्पणाच्या सामन्यात युवा फलंदाज दोनदा भाग्यवान ठरला. सामन्याचे पहिले सत्र पावसामुळे बाधित झाल्यानंतर पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेनच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात डेविड वॉर्नरला स्वस्तात माघारी धाडलं, पण दुसऱ्या सत्रात पंतच्या दोन चुकांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. पदार्पणचा कसोटी सामना खेळणारा पुकोव्हस्कीने आत्मविश्वासाने भारतीय गोलंदाजांचा केला आणि 97 चेंडूत टेस्टमध्ये पहिले अर्धशतक ठोकले. (IND vs AUS 3rd Test Day 1: विल पुकोव्हस्की-मार्नस लाबूशेनने ऑस्ट्रेलियाला सावरले, Tea ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 93 धावा)

पुकोव्हस्की 26 धावांवर खेळत असताना प्रभारी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला ओव्हर दिली. या ओव्हरमध्ये अश्विन युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला त्याला चाकावण्यात यशस्वी ठरला, पण विकेटच्या मागे पंतने सोप्पा झेल सोडला. पुकोव्हस्कीला मिळालेले जीवदान टीम इंडियाला महागात पडले आणि पुकोव्हस्की व लाबूशेन यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने संघाची धावसंख्या पन्नाशी पार नेली. त्यानंतर, पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजच्या चेंडूवर पंतने पुन्हा एकदा पुकोव्हस्कीला माघारी धाडण्याची संधी गमावली. 32 धावांवर खेळताना सिराजच्या चेंडूवर पुकोव्हस्कीने विकेटच्या मागील बाजूस हवेत शॉट खेळला, पण तो अधिक लांबपर्यंत जाऊ शकला नाही. पहिल्या प्रयत्नात पंतला कॅच पकडता आला नाही. दुसर्‍या प्रयत्नात त्याने उडी मारत कॅच पकडला आणि खेळाडूंना सांगितले की तो बाद झाला आहे. अंपायरने देखील सॉफ्ट सिग्नल देत फलंदाजाला आऊट दिले. थर्ड अंपायरने अखेरचा निर्णय देत युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला नॉट-आऊट दिलं. पहा पंतचे ते दोन कॅच:

पंतने जीवनदान दिले!

विलो पुकोव्हस्की!

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या चहाच्या वेळेपर्यंत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1 विकेट गमावून 93 धावा केल्या. पुकोव्हस्की आणि लाबूशेन यांच्यात 87 धावांची भागीदारी झाली असून यजमान संघ सध्या सामन्यात मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. आता या दोन्ही फलंदाजांवर मोठी धावसंख्या करण्याची जबाबदारी असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif