IND vs AUS 3rd Test Playing XI: टीम इंडियामध्ये Rohit Sharma चं कमबॅक तर Navdeep Saini चं पदार्पण
पण यामध्ये कर्णधारपदाची धुरा विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे कडेच असेल. तर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत असलेल्या रोहित शर्मा कडे उप कर्णधार पदाची जबाबदारी आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. यामध्ये तिसर्या कसोटीसाठी आज भारतीय संघाची घोषणा झाली आहे. प्लेईंग इलेव्हन मध्ये रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव जाहीर झाल्याने त्याचा कमबॅक झाला आहे तर Navdeep Saini चा पहिलाच सामना असणार आहे. दुसर्या सामन्यात उमेश यादवला दुखापत झाल्यानंतर आता त्याच्याऐवशी Navdeep Saini या तरूण खेळाडूला क्रिकेट संघात संधी मिळाली आहे. मागील 2 टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंडिया प्रत्येकी एक-एक सामना जिंकली आहे. IND vs AUS 2020-21: SCG टेस्ट मॅचपूर्वी पाच खेळाडूंसह टीम इंडियाची COVID-19 रिपोर्ट आली समोर, वाचा सविस्तर.
टीम इंडियाच्या प्लईंग 11 मध्ये काही बदल पहायला मिळाले आहेत. पण यामध्ये कर्णधारपदाची धुरा विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे कडेच असेल. तर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत असलेल्या रोहित शर्मा कडे उप कर्णधार पदाची जबाबदारी आहे.
इथे पहा पूर्ण प्लेईंग इलेव्हनची यादी
मयांक अग्रवालला बाजूला करत टीम इंडियामध्ये रोहित शर्माला सहभागी करण्यात आले आहे. इंडियन टीमचा ओपनर काही दुखापतींमुळे मागील 2 सामने टीम बाहेर होता. आता तो पुन्हा ऑपनिंगला पहायला मिळेल. त्याच्यासोबत शुभमन गिल ओपनिंग करणार आहे. विकेट कीपर म्हणून रिषभ पंत कायम असेल. तर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या नवदीप सैनी कडे देखील अनेकांचे आहे.
भारतीय टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.