IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून आऊट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. पण, त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत असताना पॅटिन्सनला रिबमध्ये दुखापत झाली आहे.
IND vs AUS 3rd Test: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. पण, त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनला (James Pattinson) तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत असताना पॅटिन्सनला रिबमध्ये दुखापत झाली आहे. बॉक्सिंग डे कसोटीनंतर मेलबर्नमधील संघाच्या हबकडून “मंजूर रजेवर” असताना पॅटिनसनला दुखापत झाली. माइकल नेझर आणि सीन एबॉट आधीपासूनच राखीव राखीव असल्याने ऑस्ट्रेलियन संघाने पॅटीनसनच्या जागी बदली खेळाडू म्हणून इतर खेळाडूला संधी न देण्याची घोषणा केली आहे. 7 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यू इयर टेस्ट मॅचसाठी दोन्ही संघ सोमवारी सिडनीला दाखल होणार आहेत. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये जबरदस्त कमबॅक करत टीम इंडियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. (IND vs AUS 2020-21: SCG टेस्ट मॅचपूर्वी पाच खेळाडूंसह टीम इंडियाची COVID-19 रिपोर्ट आली समोर, वाचा सविस्तर)
पॅटीनसन तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यावर ऑस्ट्रेलियाकडे गोलंदाजी पर्याय म्हणून मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन हे मुख्य बॉलर्स तर माइकल नेसर आणि मिशेल स्वीपसन हे राखीव पर्याय आहेत. डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की आणि कॅमरून ग्रीन यांच्यानंतर कांगारू संघाच्या दुखापतींच्या वाढत्या यादीमध्ये पॅटीनसनचा समावेश झाला आहे. सिडनी कसोटीसाठी वॉर्नर अद्याप तंदुरुस्त नाही, तर पुकोव्हस्की आणि ग्रीन खेळण्यास सज्ज आहेत. पॅटिनसन अखेर भारतविरुद्ध सराव सामन्यात झळकला ज्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या. पॅटीनसनने ऑस्ट्रेलियाकडून 21 कसोटी सामन्यांमध्ये 26.33 च्या सरासरीने 81 विकेट घेतले आहेत.
ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम: टिम पेन (कॅप्टन), सीन एबॉट, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्झ, मार्नस लाबूशेन, नॅथन लायन, माइकल नेसर, जेम्स पॅटिनसन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)