IND vs AUS 3rd Test Day 5 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती

पाचव्या दिवशी टीम इंडियाचे लक्ष्य असंभव असा विजय मिळवण्यावर किंवा सामना ड्रॉ करण्यावर असेल. भारतीय चाहते सिडनी कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 3rd Test Day 5 Live Streaming: टीम इंडिया (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात आज सिडनी टेस्ट (Sydney Test) मॅचच्या अंतिम पाचव्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. यजमान कांगारू संघाने भारतापुढे 407 धावांचे तगडं आव्हान ठेवलं आहे. प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वातील संघाने चौथ्या दिवसाखेर 2 विकेट गमावून 98 धावा केल्या आणि आता अंतिम दिवशी विजयासाठी 309 धावांची गरज असेल. पाचव्या दिवशी टीम इंडियाचे लक्ष्य असंभव असा विजय मिळवण्यावर किंवा सामना ड्रॉ करण्यावर असेल. SCG वर अंतिम पाचव्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 4:30 वाजता खेळ सुरु होईल. भारतीय चाहते सिडनी कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अ‍ॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (AUS Vs IND 3rd Test: रिद्धिमान साहा बनला 'सुपरमॅन'! हवेतच घेतली मार्नस लाबूशेन याची कॅच, पाहा संपूर्ण व्हिडिओ)

दुसऱ्या डावात भारताकडून फलंदाजी करत रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या डावात 70 तर दुसऱ्या डावात 71 धावांची भागीदारी केली होती. मात्र पहिल्या डावात अर्धशतकी धावसंख्या गाठणारा शुभमन यंदा 31 धावाच करू शकला तर रोहित पहिल्या अर्धशतकी खेळीनंतर 52 धावा करून माघारी परतला. पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे दिवसाची सुरुवात करतील. या दोन्ही कसोटी फलंदाजांकडून मोठ्या आणि वेगवान खेळीची अपेक्षा असेल.

पहा भारत-ऑस्ट्रेलियाचा SCG मधील प्लेइंग इलेव्हन

भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.

ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन-विकेटकीपर), डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेजलवुड.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif