IND vs AUS 3rd Test Day 2: दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडिया 2 बाद 96 धावा, सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाकडे 242 धावांची आघाडी
अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या जोरावर 242 धावांची आघाडी घेतली आहे.
IND vs AUS 3rd Test Day 2: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील सिडनी टेस्ट (Sydney Test) सामन्यात कांगारू संघाला पहिल्या डावात 338 धावांवर ऑलआऊट करत टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या दिवसाखेर 45 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 96 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या जोरावर 242 धावांची आघाडी घेतली आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) 50 तर डाऊन अंडर दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) 26 धावाच करू शकला. सिडनीमध्ये भारताकडून शुभमन आणि रोहितच्या नवीन सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी रचली व संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा नाबाद 9 धावा आणि प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 5 धावा करून खेळत होते. यजमान संघासाठी दिवसाखेर जोश हेझलवूडने रोहितला तर पॅट कमिन्सने शुभमन बाद करत भारताला शंभरच्या आत दोन मोठे धक्के दिले. रोहित 77 चेंडूत 26 धावा करुन बाद झाला. दरम्यान या खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. दुसरीकडे, शुभमन पहिले कसोटी अर्धशतक करत माघारी परतला. गिल आणि रोहितमध्ये 70 धावांची भागीदारी झाली. (Ravindra Jadeja Runs Out Steve Smith: रवींद्र जडेजाच्या अचूक थ्रो ने स्टिव्ह स्मिथ रनआऊट, संजय मांजरेकर यांच्यासह अष्टपैलूच्या फिल्डिंगवर Netizens फिदा, पहा Tweets)
गिल आणि रोहितने भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली व काही शानदार फटके खेळले. रोहितने 16व्या ओव्हरमध्ये नॅथन लायनच्या गोलंदाजीवर एक खणखणीत षटकार आणि एक चौकार ठोकत एकूण 12 धावा वसूल केल्या. पण, रोहित चांगल्या सुरुवातीचा फायदा करू घेऊ शकला नाही आणि 27व्या ओव्हरमध्ये जोश हेजलवूडने स्वत:च्याच चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर शुभमनने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतकी टप्पा गाठला. गिलने 100 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे केवळ शुमन गिलची कसोटी करिअरमधीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही होते. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो देखील बाद झाला. कमिन्सने युवा टीम इंडिया फलंदाजाला कॅमरुन ग्रीनच्या झेलबाद केलं.
भारताविरुद्ध मालिकेत धावा करण्यात अपयशी ठरलेल्या स्मिथनेसामन्याच्या दुसर्या दिवशी शतक झळकावले. स्मिथने 200 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 27वे कसोटी शतके पूर्ण केले. मार्नस लाबूशेनने 91 तर कांगारूस संघाचा पदार्पणवीर विल पुकोवस्कीने 62 धावांचे योगदान दिले. लाबूशेन-पुकोवस्की आणि अखेर लाबूशेन-स्मिथ यांच्यातील शतकी भागीदारीने संघाला आव्हानात्मक धावसंख्या करण्यात महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या दिवशी दुखापतीतून पुनरागमन करणारा डेविड वॉर्नर केवळ 5 धावाच करु शकला.