IPL Auction 2025 Live

IND vs AUS 3rd Test Day 2: स्टिव्ह स्मिथच्या दमदार शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाची त्रिशतकी मजल, भारताविरुद्ध सिडनी टेस्टच्या पहिल्या डावात केल्या 338 धावा

कांगारू संघासाठी माजी कर्णधार स्मिथने सार्वधिक 131 धावांची खेळी केली.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test Day 2: सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्यात स्टिव्ह स्मिथचे (Steve Smith) दमदार शतक, मार्नस लाबूशेनच्या 91 आणि विल पुकोवस्कीच्या 62 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिल्या डावात 105.4 ओव्हरमध्ये त्रिशतकी धावसंख्या पार करत 338 धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावात संघाची स्थिती भक्कम केली. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय (India) गोलंदाजांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या कांगारू संघासाठी माजी कर्णधार स्मिथने सार्वधिक 131 धावांची खेळी केली. स्मिथने तब्बल 14 डावानंतर पहिले टेस्ट सामन्यात शतक झळकावले. स्मिथचे कसोटी कारकिर्दीतील 27वे तर भारताविरुद्ध 8वे टेस्ट शतक होते. आपल्या खेळीत 13 चौकार लगावले. याशिवाय, लाबूशेनचे 9 धावांनी शतक हुकले. वेडने 13 धावा केल्या तर मिचेल स्टार्क 24 धावा करून परतला. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) संघासाठी सर्वाधिक 3 तर जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी यांना प्रत्येकी 2, मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळली. (IND vs AUS 3rd Test 2021: स्टीव्ह स्मिथने तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ठोकले टेस्ट शतक; विराट कोहली, रिकी पॉन्टिंग यांची केली बरोबरी)

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मेलबर्नमधील आपल्या खराब कामगिरीला मागे टाकत यंदा कांगारू फलंदाजांनी आक्रामक बॅटिंग केली आणि भारताविरुद्ध मालिकेत पहिल्यांदा धावसंख्या तीनशे पार नेली. पहिल्या दिवशी पावसामुळे वाया गेलेल्या दिवसाची भरपाई करण्यासाठी सामना अर्धातास लवकर सुरु झाला. लाबूशेन-स्मिथच्या जोडीतील शतकी भागीदारीने धावसंख्या 200 पार नेली. दुसऱ्या दिवशी देखील पाऊस लपाछपी खेळत राहिला. त्यानंतर, लाबूशेनला बाद करत जडेजाने संघाला दिवसाचे पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर स्मिथने चौकार खेचत कसोटी कारकीर्दीतील 30वे अर्धशतक झळकले. वेडने आक्रमक फलंदाजीचा प्रयत्न केलं पण चुकीच्या शॉटमुळे 16 चेंडूत 13 धावा करून माघारी परतला. कॅमरुन ग्रीनने 21 चेंडूंचा सामना केला पण एकही धाव करू शकला नाही. यानंतर कर्णधार टिम पेनला दुपारच्या जेवणानंतर बुमराहने त्रिफळाचित करत पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

पुकोवस्की आणि लाबूशेनने सामन्याचा पहिला दिवस गाजवल्यावर स्मिथने दुसऱ्या दिवशी वर्चस्व कायम ठेवले. स्मिथने 2019 मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध 211 खेळीनंतर पहिल्यांदा कसोटीत तिहेरी धावसंख्या गाठली.