IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी टेस्टच्या पहिल्याच दिवशी पावसाने आणला व्यत्यय, ऑस्ट्रेलियाचा स्कोर 21/1
IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु झालेल्या तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळे थांबविण्यात आला आहे. डावाच्या आठव्या षटकातील पहिल्या चेंडूनंतर आलेल्या पावसाने खेळाडूंना मैदान सोडण्यास भाग पाडले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 7.1 ओव्हरमध्ये एका विकेट गमावून 21 धावा केल्या होत्या.
IND vs AUS 3rd Test Day 1: सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सुरु झालेल्या तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळे थांबविण्यात आला आहे. डावाच्या आठव्या षटकातील पहिल्या चेंडूनंतर आलेल्या पावसाने खेळाडूंना मैदान सोडण्यास भाग पाडले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 7.1 ओव्हरमध्ये एका विकेट गमावून 21 धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने पुनरागमन करणाऱ्या सलामी फलंदाज डेविड वॉर्नरच्या (David Warner) रूपात पहिली विकेट गमावली. सिडनी कसोटीच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला आणि स्लिपमध्ये वॉर्नरला वैयक्तिक पाच धावांवर चेतेश्वर पुजाराकडे स्लिपमध्ये झेलबाद करत माघारी धाडले. पहिली कसोटी खेळणारा विल पुकोव्हस्की नाबाद 14 आणि मार्नस लाबूशेन नाबाद दोन धावा करून खेळत आहेत. (IND vs AUS 3rd Test: काय सांगता! अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात 'या' 11 खेळाडूंनी केले आंतरराष्ट्रीय डेब्यू, नावं जाणून व्हाल चकित)
दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या वॉर्नरसह कसोटी पदार्पण करणारा पुकोव्हस्की डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला आणि चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने वॉर्नरला कॅच आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेला रोहित शर्मा संघात परतला आहे तर फॉर्मशी झुंजणाऱ्या मयंक अग्रवालला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे. सैनी सिडनी सामन्यातून कसोटी पदार्पण करणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी फलंदाज पुकोव्स्कीला कसोटी पदार्पण करण्याची संधी आहे तर ट्रॅव्हिस हेड दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या जो बर्न्सच्या जागी वॉर्नरला संघात स्थान देण्यात आले आहे.
दोन्ही संघांमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना असून सध्या मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. अॅडिलेड येथील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात कांगारू संघाने 8 विकेटने दमदार विजय मिळवला तर मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार कमबॅक केलं आणि कांगारू संघाची धुलाई करत 8 विकेटने सहज विजय मिळवला.