IND vs AUS 3rd Test: टिम पेनने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय; Will Pucovski चे ऑस्ट्रेलियासाठी डेब्यू

आजच्या सामन्यात कांगारू संघाचा कर्णधार टिम पेनने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने Will Pucovski ला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट 2020-21 (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या पिंक टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. आजच्या सामन्यात कांगारू संघाचा कर्णधार टिम पेनने (Tim Paine) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ‘पिंक टेस्ट’ म्हणूनही ओळखला जाईल. या टेस्ट मॅचमधून स्तन कर्करोगाबाबत जागरूकता केली जाते, म्हणूनच या कसोटी सामन्याच्या निमित्ताने सर्व स्टेडियम गुलाबी रंगाने रंगवले जाते. दोन्ही संघातील चार सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरी आहे, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. अशा स्थितीत, आजपासून सुरु होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कधी बदल करण्यात आले आहेत. यजमान ऑस्ट्रेलियाने Will Pucovski तर भारताने नवदीप सैनीला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. (IND vs AUS 3rd Test Match Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?)

रोहित शर्माने दुखापतीतून सावरल्यानंतर संघात कमबॅक केलं आहे तर मयंक अग्रवालला बाहेर करण्यात आले आहे. रोहित पुन्हा एकदा सलामी फलंदाजाच्या रूपात मैदानावर पुनरागमन करेल. युवा शुभमन गिलसह रोहित सलामीला मैदानावर उतरेल. शिवाय, दुखापतीमुळे माघार घेतलेल्या उमेश यादवच्या जागी सैनीला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या दौऱ्यावर डेब्यू करणारा सैनी चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी, टी नटराजन, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी यंदाच्या डाऊन अंडर दौऱ्यावर डेब्यू केले. दुसरीकडे, कांगारू संघासाठी डेविड वॉर्नरचा समावेश झाला आहे. वॉर्नर 22-वर्षीय विलो पुकोव्हस्कीसह सलामीला येईल. मॅथ्यू वेड मधल्या फळीची जबाबदारी सांभाळेल.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचा SCG मधील प्लेइंग इलेव्हन

भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.

ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन-विकेटकीपर), डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेजलवुड.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif