IND vs AUS 3rd Test: सिडनी येथे टेस्ट डेब्यूसाठी नवदीप सैनीने ‘या’ गोष्टींमुळे शार्दूल ठाकूर-टी नटराजनविरुद्ध जिंकली रेस, वाचा सविस्तर

सिडनी कसोटी सामन्यात सैनीला पसंती देण्यामागे 3 महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे. सैनी, शार्दुल आणि नटराजन यांच्यात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी स्पर्धा रंगली होती.

नवदीप सैनी (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाकडून (Team India) नवदीप सैनीला (Navdeep Saini) आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. मेलबर्नच्या मैदानावर दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये उमेश यादवला दुखापत झाल्यावर तिसऱ्या गोलंदाजाच्या जागेसाठी सैनीसह शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन देखील शर्यतीत होते. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मर्यादित ओव्हरच्या पदार्पणाच्या मालिकेत दमदार कामगिरी केलेल्या नटराजनला कांगारू संघाविरुद्ध कसोटी पदार्पणाची देखील संधी मिळते का याची सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मात्र, प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने या दोन्ही खेलदूंवर सैनीला पसंती दिली. सैनी, शार्दुल आणि नटराजन यांच्यात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी स्पर्धा रंगली होती. मात्र, अखेर सैनीने बाजी मारली आणि आता तो सिडनीमध्ये कसोटी पदार्पणासाठी सज्ज आहे. (IND vs AUS 3rd Test 2021: सिडनी टेस्ट दरम्यान राष्ट्रगीत सुरु असताना टीम इंडियाचा तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद सिराजला अश्रू अनावर, पहा हृदयस्पर्षी Video)

सिडनी कसोटी सामन्यात सैनीला पसंती देण्यामागे 3 महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे. ज्यामुळे त्याने शार्दूल आणि नटराजनविरुद्ध रेस जिंकली. पहिली गोष्ट म्हणजे इतर दोन गोलंदाजांपेक्षा सैनी वेगवान आहे. त्याचा चेंडू अधिक उसळी घेतो ज्यामुळे सिडनीच्या खेळपट्टीवर तो अधिक प्रभावी सिद्ध होऊ शकतो. शिवाय, त्याची लाईन आणि लांबी पांढर्‍या बॉलपेक्षा लाल बॉलमध्ये चांगली मानली जाते. दुसरे म्हणजे, सिडनीची खेळपट्टी असल्याचे स्पष्ट होत आहे. सिडनीची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी उपयुक्त असते आणि त्यांना बाद करण्यासाठी वेगवान गती व बाऊंस मदतगार ठरतो. अशा स्थितीत नटराजन व शार्दुलच्या तुलनेत सैनी जास्त वेगवान गोलंदाजी करू शकतो व त्याच्याकडे उत्तम बाउन्सर टाकण्याची कला देखील आहे. सैनीच्या या गोष्टीमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला असू शकतो.

आणि तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे सैनी जवळपास दीड वर्षांपासून भारत-अ संघाकडून खेळत आहे, त्याने अनेक देशांमध्ये प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. म्हणजेच सैनी कसोटी सामने खेळला नसला तरी त्याच्याकडे केवळ रणजीच नाही तर अन्य चांगले सामना खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या घरगुती कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 46 सामन्याच्या 77 डावांमध्ये 28.3 च्या सरासरीने 125 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्याने चार वेळा 5 विकेट आणि चार वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. म्हणूनच ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्तम कामगिरीची अपेक्षा करत सैनीला टेस्ट डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif